Centre Minister Narayan Rane Latest News
Centre Minister Narayan Rane Latest News Sarkarnama
मुंबई

उद्धव ठाकरे जगातील 'ढ' माणूस...राणेंची टीका

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आधीच शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक युद्ध रंगायला सुरूवात झाली असून काल मुंबईतील गोरेगाव येथे पार पडलेल्या गट प्रमुखांच्या मेळावात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, यावर भाजपकडून प्रतिक्रिया येत असून उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा, लबाड लांडगा असून जगातील 'ढ' माणूस आहे. त्यांच्या सारखा खोटारडा माणूस मी पाहिला नाही, अशा शब्दांत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणावर टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Centre Minister Narayan Rane Latest News)

राणे म्हणाले, मला भाजपात प्रवेश देऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी शहांना कालपर्यंत फोन करत होते. त्याच शहांवर तुम्ही गिधाडं वगैरे टीका करता. चांगले बोलता येत नाही काय? बाप पळविणाऱ्या औलादीचे भाष्य करताय, बापाची ध्येय धोरणं न ठेवणारा हा माणूस आहे. बाळासाहेबांची एकनाथ शिंदे आणि आमदार आठवण काढतात, त्याला चोरी कसे काय म्हणू शकता. साहेब असे नव्हते, ते मोठ्यांचा आदर करायचे.

हे चार खासदार, दहा आमदार निवडून आणू शकत नाही. यांनी किती मराठी लोकांना रोजगार दिला. काल जे बोलले की, खोका, गिधाडं आता संजय राऊतांची सोबत करायला त्यांना जावं लागणार आहे. खोक्यांची चौकशी होणार असून यांच्या मागेही ईडी लागणार,अशा शब्दात टीका करत त्यांनी ठाकरेंना इशाराही दिला.

दरम्यान,पदासाठी, पैशांसाठी आणि खोक्यासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली. शहा मुंबईवर चालून आले असे म्हणता, देशाचा गृहमंत्री मुंबईत आला तर मुंबई तुमची आहे का? कलानगरला टक्केवारीसाठी ऑफिस उघडले. पालिकेच्या टेंडरमागे १५ टक्के घेत होते. आता आम्हाला ठेकेदारांनाच समोर आणावे लागेल. मुंबईवर संकट येते तेव्हा केंद्र सरकार नेहमी महाराष्ट्राला मदत करते. अशी एकही नैसर्गिक आपत्ती नाही, तिकडून मदत आली नाही. मातृभूमीसाठी तुम्ही काय केलं? मुंबईत दोन लाख भिकारी आहे. मात्र त्यांच्यासाठी आपण काय केलं, अशा शब्दात राणेंनी ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT