मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आधीच शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये जणू दसरा मेळाव्याची रंगीत तालीम सुरू झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. काल मुंबईतील गोरेगाव येथे पार पडलेल्या गट प्रमुखांच्या मेळावात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
आताच्या मेळाव्याला इतकी गर्दी तर दसरा मेळाव्याला किती असेल, असे म्हणत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावरच होणार असल्याचे स्पष्ट केले. तर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी 'गटप्रमुखांचा मेळावा तो सिर्फ झाकी है, दसरा मेळावा' अभी बाकी है', अशा शब्दात शिंदे गटाला सुनावले. (Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde News)
दानवे म्हणाले की, कालचा मेळावा जर बघितला तर बसण्यासाठी जागा नव्हती, एवढ्या मोठ्या सख्येंत गट प्रमुखांनी हजेरी लावली होती. हा तर फक्त मुंबईचा मेळावा होता अजून महाराष्ट्र येण्याचं बाकी असून त्यामुळे 'समझनेवालों को इशारा काफी है, गटप्रमुख मेळावा तो सिर्फ झाकी है, दसरा मेळावा अभी बाकी है. याबरोबरच दसरा मेळावा हा 'शिवतीर्था'वरच होणार, असे दानवेंनी ठणकावून सांगितले.
शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. आम्हाला विश्वास आहे न्यायालय योग्य न्याय देईल. कालची मेळाव्याची गर्दी ही केवळ झाकी होती पिच्चर बाकी आहे. मुंबई महापालिकेला केवळ परवानगी देण्याचे अधिकार आहेत. कायदा सुव्यवस्था हा पोलिसांचा प्रश्न आहे. पाऊस पडला तेव्हा केवळ मुंबईत नाही तर ठाणे, पुण्यातही पाणी तुंबले होते. आमची दसरा मेळाव्याची तयारी झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकण्यासाठी लाखो शिवसैनिक मुंबईत येतील, असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून वाद सुरू असून परंपरेप्रमाणे कोण शिवतीर्थावर मेळावा घेणार याबात अद्यापही स्पष्ट झाले नाही. आता हा वाद उच्च न्यायालयात गेला असून यावर उद्या सुनावणी होणार आहे. मात्र, कालच्या गट प्रमुखांच्या मेळावात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आणि हिंमत असेल तर एका महिन्याच्या आत मुंबई महापालिका आणि जमलं तर विधानसभेच्याही निवडणुका घ्या, असे थेट आव्हान दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.