BJP Prasad Lad Sarkarnama
मुंबई

BJP Prasad Lad : दोन हजार लोकांसह हल्ला करणार; भाजप नेत्याला धमकी दिल्याने खळबळ

BJP Prasad Lad coordinator Mahayuti Mumbai police : भाजपचे बडे नेते प्रसाद लाड यांना नेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली असून, मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यात गेल्या काही तासांपासून राजकीय नेत्यांना टार्गेट करण्याच्या घटना घडत आहे. पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या करण्यात आली, तर बीडमधील मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली.

यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, राज्याच्या राजकारण आणखी खळबळ उडवून देणारे वृत्त समोर आलं आहे. भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

प्रसाद लाड विधानपरिषदेचे आमदार आहे. महायुतीचे (Mahayuti) समन्वयक म्हणून देखील त्यांच्यावर जबाबदारी आहे. दोन हजार लोकांना बरोबर घेऊन हल्ला करणार असून, जीवे मारण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ही धमकी मनीष निकोसे व्यक्तीने दिल्याचे मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे.

प्रसाद लाड यांना धमकी दिली तो आरोपी कधी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचं, तर कधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचा दावा करतो. यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. प्रसाद लाड यांनी मुंबई पोलिसांना (Police) या धमकी प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

मुंबई पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीकडून आमदार लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आलं आहे. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घ्यावं, तसेच त्याची कसून चौकशी करावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी पोलिसांकडे केली आहे. धमकी देताना अतिशय शिवीगाळ समोरचा व्यक्ती करत होता, असेही प्रसाद लाड यांनी तक्रारीत म्हटले आहे.

भाजप नेते प्रसाद लाड महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासूपैकी एक नेते आहेत. महाराष्ट्र मध्ये 2022 साली झालेल्या सत्तांतरामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे, असे ही म्हटले जाते. एके काळी राजकारणात त्यांचा कोणीही गॉड फादर नव्हता. पण ते आज अनेकांचे राजकीय गॉडफादर आहेत. त्यांच्या जवळचे कार्यकर्ते त्यांना 'बॉस' देखील म्हणतात. आमदार प्रसाद लाड मुंबईमधील माटुंगा नामक उच्च लोक वस्तीत राहतात. प्रसाद लाड राजकारणात सक्रिय आहेतच, पण ते एक उत्तम उद्योजक सुद्धा आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT