BJP Thane Mission : भाजपचं ठरलं, शिंदेंच्या ठाण्यात महापौर करायचा; आमदार केळकर म्हणाले, 'विजयाचं गणितं कार्यकर्त्यांनी ठरवलं'

Eknath Shinde ShivSena Mahayuti BJP MLA Sanjay Kelkar mayor Thane Municipal Corporation : ठाणे जिल्ह्यात भाजप मोठा भाऊ झाल्याने महापालिका निवडणुकीत महापौर पदावर दावा करण्याची रणनीती आखली गेली आहे.
BJP Thane Mission
BJP Thane Mission Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपचा 'कॉन्फिडन्स' वाढलाय. भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील ताकद वाढवण्याचा प्लॅन तया केले जात आहेत. यात राज्यातील मोठ्या महापालिका ताब्यात घेण्याचे नियोजन आहे.

मुंबई पाठापोठ ठाण्याची महापालिकेवर भाजपला कशी मिळवता येईल, याचे प्लॅनिंग सुरू आहे. भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेची निवडून हाती घेतल्याने, तिथं भाजपचा महापौर निश्चित होणार असल्याचे 'कॉन्फिडन्स' व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर मुंबई, ठाणे, कल्याण, कोकण परिसरात शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जागा कमी झाल्याचे पुढे आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच पूर्ण ताकदीने उतरण्याचे नियोजन करत आहे. महायुतीमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे यांना आता आव्हान देण्यास भाजपनेच्या स्थानिक आमदारांनी सुरवात केली आहे.

BJP Thane Mission
BJP Mission Mumbai : 'प्लॅन तयार आहे, मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार'; आशिष शेलारांचा 'कॉन्फिडन्स'

ठाण्यातील भाजप (BJP) आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात भाजपचा महापौर होईल, असे सांगून भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेतल्याचे सांगितले. भाजपने यासाठी कार्यकर्त्यांना बळ द्यावे, असेही आमदार कळेकर यांनी म्हटले आहे. ठाणे महापालिकेत महापौर आमचा बसावा, यासाठी मागील 10 वर्षे आम्ही आवाज उठवत आहोत. ठाण्यात महापौर आमचा व्हायला हवा, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आम्ही युतीचा धर्म पाळत आलो, त्यामुळेच ठाण्यासह जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढत असतानाही कमी जागांवर महापालिका निवडणुका लढवल्या. परंतु, आता भाजप ठाण्यातच नाही, तर जिल्ह्यात मोठा भाऊ झाला आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक पातळीवर लढावे, अशी इच्छा प्रत्येक कार्यकर्त्याला होणे यात काही गैर नाही, असे केळकर म्हणाले.

BJP Thane Mission
Aditya Thackeray letter to CM Fadnavis: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवले पत्र अन् केली 'ही' मोठी मागणी, म्हणाले...

ठाणे महापालिकेत 131 जागा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी प्रभाग रचनेबाबत काय निर्णय होईल, हे पाहावे लागेल. ठाण्यावर पहिल्यापासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मुंबई आणि मुंबई परिसरातील शिवसेनेच्या ताकदीवर परिणाम झाला आहे. विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहा, तर भाजपचे नऊ आमदार आहेत. संख्याबळानुसार भाजपने पालकमंत्री पदावर देखील सुरू केलाय. रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्यासारखे मातब्बर नेते हे भाजपकडे आहे. भाजपने पालकमंत्री पद मिळवल्यास त्याचा फायदा महापालिका निवडणुकीत घेण्याचा पुरेपर प्रयत्न भाजप करेल, असेच दिसते.

गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने ठाणे जिल्ह्यामध्ये पकड मजबूत झाली आहे. पक्ष विस्तार चांगल्या पद्धतीने करण्यात आला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर या ठिकाणी भाजप वाढला आहे. यामुळे भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळाची चाचपणी करत आहे. आता मुख्यमंत्रिपद हे भाजपकडे आल्यामुळे आता भाजप ठाणे जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळा निर्णय घेऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षाची वाढण्याची इच्छा असली किंबहुना शिंदेंना कमकुवत करण्याची इच्छा असली,तरी देखील राज्य आणि केंद्रातील नेतृत्व स्थानिक नेत्यांना ते करू देईल,असं वाटत नाही. पण महापालिका निवडणुकीत भाजप एकनाथ शिंदे यांची पुरती कोंडी करताना दिसेल, असेच सध्या तरी भाजपच्या आक्रमक कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरून वाटते. एकनाथ शिंदेच ठाणे जिल्ह्याचे किंग राहणार की, अन्य काही राजकारण भाजप खेळणार हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com