Pravin Darekar Sarkarnama
मुंबई

महाविकास आघाडी सरकारकडून दरेकरांना मिळालं बक्षीस! खुद्द त्यांनीच दिली कबुली

विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे अडचणीत आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना हे अडचणीत आले आहेत. यावरून दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारला थेट आव्हान दिले आहे. सरकारने शंभर गुन्हे दाखले केले, दहा वेळा अटक केली तरी मी घाबरत नाही, असे दरेकरांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेत्याचे काम चोखपणे बजावल्याचे बक्षीस मिळाल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) दिलासा न मिळाल्याने दरेकरांना अटक होण्याची शक्यता आहे. मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक न करण्याची दरेकर यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर दरेकरांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या याचिकेवर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. सरकारी वकील अन्य खटल्यांमध्ये व्यग्र असल्याने सोमवारची वेळ मागितली आहे. दरेकरांना सोमवारपर्यंत अटक करु नये, असा आदेश सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला आहे.

दरेकर म्हणाले की, महाराष्ट्राच सहकारात चाललेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सगळ्यांची मदत घेणार आहे. आम्ही समजायचो की सहकारात ९० गोष्टी चांगल्या आहेत आणि १० गोष्टी वाईट आहेत. त्या वाईट दुरुस्त करून पुढे जाऊ. परंतु, त्या ठिकाणी आम्ही कर्ज दिले ते चुकीचे. सांगली आणि सातारा जिल्हा बँकांची मी माहिती मागवत आहे. पण कोण उत्तर देत नाही. कोल्हापूर आणि पुणे जिल्हा बँकांचाही कारभार असाच आहे. राज्यात ज्या काही चार-पाच उत्तम बँका आहेत. त्यात मुंबै बँक आहे. तिला आता टार्गेट केले जात आहे. या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश आम्ही अधिवेशनात करणार आहोत.

आम्ही सहकारात चांगल्या संस्था चालवतोय, आम्ही सहकारात नेतृत्व करतोय. राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून मी चुकीच्या गोष्टी समोर आणतोय. म्हणून माझ्यावर गुन्हे दाखल करताय. मला अटक करा, माझ्यावर १०० गुन्हे दाखल करा. पण मी कुणाला घाबरत नाही. मला १० वेळा अटक करा, आम्ही घाबरणार नाही. सत्याच्या बाजूने आम्ही उभे राहणारच. विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी चोखपणे बजावण्याचे बक्षीस सरकार आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून देत आहे, असेही दरेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT