मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हणजेच मुंबै बँकेच्या (Mumbai District Bank Election) निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचेच वर्चस्व राहिले आहे. शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अशी अनोखी युती झालेल्या या निवडणुकीत तिन्ही पक्षांच्या सहकार पॅनेलचे सर्व 21 उमेदवार निवडून आले आहेत. यापूर्वीच 17 जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित चार जागांवरही सहकार पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत.
बँकेच्या एकूण 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ता. 2 जानेवारी रोजी चार जागांसाठी निवडणूक झाली होती. त्याआधीत दरेकर यांच्यासह 17 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित चार जागाही बिनविरोध करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यामुळे ही निवडणूक झाली. अखेर या चार जागाही दरेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने जिंकल्या आहेत.
सहकार पॅनेलच्या पुरुषोत्तम दळवी (मध्यवर्ती ग्राहक), विठ्ठल भोसले (प्राथमिक ग्राहक), जयश्री पांचाळ (महिला सहकारी संस्था) आणि अनिल गजरे (भटक्या विमुक्त जातीजमाती) हे विजयी झाले आहेत. त्यांना अनुक्रमे कमलाकर नाईक, सुखदेव चौगुले, शालिनी गायकवाड आणि यलप्पा कुशाळकर यांनी आव्हान दिले होते. शिवसेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक झाली.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार -
अर्बन बँक गटातून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, संदीप घनदाट, गृहनिर्माण सहकारी संस्था गटातून आमदार सुनील राऊत, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, पगारदार पतसंस्था गटातून आमदार प्रसाद लाट, नागरी पतसंस्था गटातून शिवाजीराव नलावडे, महिला गटातून शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख, इतर मागासवर्ग गटातून नितीन बनकर, एससी-एसटी गटातून विनोद बोरसे, औद्योगिक गटातून विष्णू घुमरे, सिध्दार्थ कांबळे, इतर सहकारी संस्था गटातून नंदकुमार काटकर, जिजाबा पवार, वैयक्तिक गटातून सेनदेव पाटील आणि मजूर संस्था गटातून आनंदराव गोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.