आमदार सावंत अन् संभाजीराजेंची खलबतं; मोठ्या निर्णयाच्या शक्यतेनं चर्चेला उधाण

येत्या दोन-चार महिन्यात दिवस बदलतील, मी नव्या रुपात तुमच्या समोर येणार आहे, असे सावंत म्हणाले होते.
SambhajiRaje Chhatrapati, Tanaji Sawant

SambhajiRaje Chhatrapati, Tanaji Sawant

Sarkarnama 

Published on
Updated on

पुणे : शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी काही दिवसांपूर्वीच सूचक विधान करत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले होते. पक्षावर नाराज असलेल्या आणि भाजपशी (BJP) जवळीक साधून दबाव तंत्राचा वापर करणारे तानाजी सावंत यांनी आज खासदार संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati) यांची पुण्यात भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे सावंत हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

`येत्या दोन-चार महिन्यात दिवस बदलतील, मी नव्या रुपात तुमच्या समोर येणार आहे. मग माझ्याकडे काय मागायचे ते मागा. कोरड्या राजकारणात आपल्याला रस नाही,' अशी भावना सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. त्यामुळे ते शिवसेनेत (Shiv Sena) नाराज असल्याचे बोलले जाते. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून सावंत हे शिवसेनेपासून काहीसे दुरावल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता त्यांचे नवे रुप नेमके काय असणार आहे, याची उत्सूकता त्यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे.

<div class="paragraphs"><p>SambhajiRaje Chhatrapati, Tanaji Sawant</p></div>
धक्कादायक : एकाच शाळेतील 85 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

गेल्या युतीच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले शिवसेनेतील वजनदार नेते म्हणून तानाजी सावंत ओळखले जातात. पण राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले आणि सावंत झाकोळले गेले. रविवारी त्यांनी अचानक संभाजीराजेंची भेट घेतल्याने पुन्हा चर्चेला उधाण आलं. सावंत यांच्या कात्रज येथील घरी हे भेट झाल्याचे समजते. या भेटीचा सविस्तर तपशील अद्याप मिळाला नसला तरी त्यावरून राजकीय तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

सावंत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ही भेट म्हणजे त्याचीच सुरूवात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी तुळजापुरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासमवेत नुकत्याच घेतलेल्या भेटीकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. पुन्हा वेगळ्या रुपात तुमच्या समोर येणार आहे, काही मागायचं ते मागा, असे सांगत सत्ता बदलाचे स्पष्ट संकेतही सावंत यांनी नुकतेच दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आमदारांमध्ये असलेली खदखद पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आली आहे.

<div class="paragraphs"><p>SambhajiRaje Chhatrapati, Tanaji Sawant</p></div>
दादागिरी थांबवा नाहीतर...! शशिकांत शिंदेंना डिवचत शिवेंद्रसिंहराजेंचा निर्वाणीचा इशारा

शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील छुपा राजकीय संघर्ष नुकताच समोर आला आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा हा व्हीडीओ समोर आल्याने शिवसेना आमदारातील नाराजी व खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. शिवसेना आमदारांची कामे होत नसल्यानेही काही शिवेसना आमदारांमध्ये झुपी नाराजी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com