Ram Kadam Sarkarnama
मुंबई

मलिकांच्या अटकेवर राम कदमांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना गर्भीत इशारा; म्हणाले..

भाजप (BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या (NCP) नेत्यांवर टीका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गुंड दाऊद इब्राहीम मनी लॉन्डींग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते (NCP) व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरावर आज (ता. 23 फेब्रुवारी) ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी छापा टाकून मलिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले व तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

भाजपने मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली व फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. याप्रकरणी भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनीही टीप्पणी केली असून मलिकांवरील कारवाई ही सुरूवात असून राष्ट्रवादीचे अजून काही नेत्यांवर कारवाई होणे बाकी आहेत. भ्रष्ट नेत्यांवर कारवाई होणारच, अश्या अशयाचे ट्वीट करत राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचले आहे.

कदम आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, नवाब मलिकांवरील कारवाई ही तर सुरूवात आहे. अजून बऱ्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई होणे बाकी आहे. ज्यांचे अंडरवर्ल्ड सोबत संबध आहेत अशा नेत्यांवर कारवाई होणारच आहे. द्वापर युगातील एक सीख आहे की, फार वेळ कौरवांचा आतंक आणि राज्य चालत नाही. सत्याला जास्त दाबले जाऊ शकत नाही, अश्या अशयाचे ट्विट कदम यांनी करत राष्ट्रवादीच्या अजून काही नेत्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, आज दिवसभरापासून मलिकांवर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या कारवाईचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तिव्र विरोध केला. तर, भाजप नेत्यांनी त्यांच्या अटकेवर आनंद व्यक्त केला आहे. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्षांनी मलिकांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबरोबरच आज दुपारी पावणे तीन वाजता ईडीने (ED) अटक केल्यानंतर मलिकांच्या कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद झाला. यानंतर सायंकाळी त्यांना ईडीची आठ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT