Dombivli: महाविकास आघाडीचे सरकार जाऊन तीन वर्षांचा काळ उलटला, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरुन पायऊतार झाले. यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार आले, मुख्यमंत्रिपदी आता देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले आहेत असे असताना जळगाव येथे एका घटनेने एकच खळबळ उडवून दिली आहे.
जळगावात महावितरणकडून ग्राहकांना विज बिलाचे वितरण करण्यात आले आहे. या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून आजही उद्धव ठाकरे यांचा फोटो छापण्यात येत आहे. हा प्रकार समोर येताच चर्चांना एकच उधाण आले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देखील यामुळे शॉक बसला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
जळगावात महावितरणने घरोघरी पाठविलेल्या विज बिलावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.त्याचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. यावरून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रविंद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. हे योग्य नाही. हे जर चुकून झाले असेल तर ठिक आहे. मात्र हेतू पुरस्पर या गोष्टी होत असतील तर त्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले आहे.
जळगाव येथील घटनेविषयी त्यांनी आपले मत व्यक्त करताना महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. वीज बिलावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असेल तर हे योग्य नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार आहे. हे जर चुकून झाले असेल तर ठीक आहे. परंतु हेतू पुरस्पर या गोष्टी होत असतील, त्यामुळे हे प्रकार घडत असतील तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
भाजपच्या देश राज्यव्यापी अभियानातर्फे डोंबिवलीत रविवारी संघटन पर्व उपक्रम अंतर्गत प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रविंद्र चव्हाण या नोंदणी अभियानास उपस्थित होते. नागरिकांशी संपर्क साधून नोंदणी केली की नाही याची माहिती चव्हाण घेत होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.