Nitesh Rane Sarkarnama
मुंबई

BJP leaders Varaha Jayanti trend : भाजप नेत्यांकडून वराह जयंतीचा ट्रेंड, सलग दुसऱ्या वर्षी राणेंच्या आवाहनाला प्रतिसाद : मुस्लीम समाजाला डिवचण्यासाठीचा नवा मुद्दा?

Nitesh Rane Varaha Jayanti appeal News : वराह जयंती साजरी करण्यावरुन राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांनी या माध्यमातून मुस्लीम समाजाला डिवचण्यासाठीचा नवा मुद्दा आणला असल्याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे राज्यभरातील घडामोडीना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील हिंदू समजात एकजूट निर्माण करण्याच्या उद्देशाने मंत्री नितेश राणे यांनी वराह जयंती साजरी करण्याच्या आवाहनाला सलग दुसऱ्या वर्षी प्रतिसाद लाभला आहे. सलग दुसऱ्यावर्षी राज्यभरात हिंदू बांधवांनी वराह जयंती साजरी केली. वराह जयंती साजरी करण्यावरुन राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांनी या माध्यमातून मुस्लीम समाजाला डिवचण्यासाठीचा नवा मुद्दा आणला असल्याची चर्चा रंगली आहे.

मुंबईत सकल हिंदू समाजातर्फे 25 ऑगस्टला सात ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पूजाअर्चा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आगामी काळात मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील हिंदू समाजात एकजूट निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे राजकीय विश्लेषकाचे मत आहे.

भाजप (BJP) आमदार नितेश राणे यांनी सकल हिंदूचे मोर्चे काढून सतत वादग्रस्त विधाने केल्याने ते कायम चर्चेत राहिले आहेत. त्यांनीच 20 ऑगस्ट 2025 रोजी सीएम देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून 25 ऑगस्टला राज्यभर “वराह जयंती” अधिकृतरीत्या साजरी करावी, सरकारी पातळीवर कार्यक्रम घ्यावेत, अशी मागणी केली होती. गेल्या वर्षीही हा सण परंपरेने काही ठिकाणी मर्यादित प्रमाणात साजरा करण्यात आला होता. तरी यंदा राज्यव्यापी अधिकृततेची मागणी करून त्याला मोठे 'राजकीय फ्रेमिंग' देण्यात आले आहे.

राज्यात सलग दुसऱ्यावर्षी नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या आवाहनानंतर वराह जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आली. या वराह जंयतीच्या निमित्ताने राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. हिंदू धर्मात वराह जयंतीला एक वेगळं महत्त्व असून विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार म्हटला जातो. मात्र मुस्लिम समाजात वराह प्राण्याबद्दल बोलणंही पाप मानले जाते. दुसरीकडे आपल्या कुटुंबासहित गावागावात वराह जयंती साजरी करण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले होते.

नितेश राणे यांनी सलग दुसऱ्या वर्षी वराह जयंती साजरी करण्याचे आव्हान केल्यानंतर त्याला सर्वच विरोधी पक्षाने जोरदार विरोध केला होता. राणेंच्या या निर्णयाविरोधात आक्रमक होत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी जयंती साजरी करण्यास विरोध केला होता.

दुसरीकडे मंत्री नितेश राणे यांच्यासोबतच भाजप नेत्यांनी या माध्यमातून मुस्लीम समाजाला डिवचण्यासाठीचा नवा मुद्दा आणला असल्याची चर्चा रंगली आहे. वराह जयंती भाजप नेत्यांनी साजरी करून विशेष महत्त्व दिल्याचे या निमित्ताने स्पष्टपणे दिसत आहे. येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आता वराह जयंती साजरी करण्यात आली असल्याने चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT