Chandrakant patil Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

मंत्रीपदावरून भाजपत लॉबिंग : चंद्रकांत पाटलांना हव महसूल मंत्रीपद

भाजपकडून मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या नावाची पहिली यादी तयार केली जात आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई - राज्यात शिवसेना बंडखोर व भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. उर्वरित मंत्रीपदाच्या वाटपावरून कुठे नाराजी नाट्य तर कुठे लॉबिंग सुरू झाले आहे. भाजपकडून मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या नावाची पहिली यादी तयार केली जात आहे. BJP News Update

राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी जाहीर केली. या जागेसाठी सुरवातीला माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव चर्चेत होते मात्र विखे पाटलांना कॅबिनेट मंत्रीपदच हवे असल्याने अखेर त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली तर मंत्रीपदाच्या वाटपावरून शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचीही चर्चा काल सुरू होती.

अशातच आता राज्याच्या मंत्रीमंडळातील मोठी मंत्रीपदे मिळविण्यासाठी लॉबिंग सुरू झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महसूल मंत्रीपद हवे आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा अथवा तत्सम मोठे पद मिळावे अशी अपेक्षा आहे. राम शिंदे यांच्याकडेही जलसंधारण मंत्रीपद पुन्हा मिळण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील उर्वरित मंत्र्यांचा शपथ विधी चार अथवा पाच जुलैला होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण भाजपमध्ये एका व्यक्तीला एकच पद देण्याचा प्रघात आहे. मात्र त्यांनी महसूलमंत्रीपद मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपचे सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीष महाजन, प्रवीण दरेकर, जयकुमार रावत, अतुल भातखळकर, मनीषा चौधरी यांच्या नावाची मंत्रीपदासाठी चर्चा आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रीमंडळात जुन्या चेहऱ्या बरोबरच नवीन चेहरेही मंत्रीमंडळात दिसू शकतात. मंत्रीमंडळातील मंत्र्यांची पहिली यादी तयार केली जात असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT