Mohit Kamboj Mayor Claim Sarkarnama
मुंबई

Mohit Kamboj Mayor Claim : भाजपचा महापौरपदाचा उमेदवार ठरलाय तो म्हणजे..! ठाकरेंचा शिलेदार म्हणतो, 'मराठी माणसाने..!'

BJP Mahayuti Claims Mohit Kamboj as Mumbai Mayor, Akhil Chitre Post Goes Viral : भाजप महायुतीकडून मुंबई महापालिकेचा महापौर ठरला असल्याची शिवसेना ठाकरे पक्षाचे अखिल चित्रे यांची पोस्ट चर्चेत आहे.

Pradeep Pendhare

BJP Mahayuti Mumbai Mayor : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. यात सर्वाधिक लक्ष लागले आहे ते, मुंबई महापालिकडे! मुंबईचा महापौर कोण होणार, यावर जसा खल सुरू आहे, तसं राजकारण देखील तापलं आहे.

मुंबईचा महापौर मराठीच होणार, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि मनसेकडून ठामपणे सांगितले जात असताना, भाजप महायुतीकडून मात्र त्यावर वेगवेगळी विधाने येत आहेत. याच विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे अखिल चित्रे यांनी 'एक्स'वर भाजप महायुतीकडून महापौर कोण असेल, याबाबत केलेली पोस्ट चर्चेत असून, त्यावरून राजकारण तापलं आहे.

भाजप महायुतीकडून मुंबई महापालिकेच्या महापौरपदाचं नाव फिक्स झालं आहे. भाजप (BJP) महायुतीने मुंबई महापालिका निवडणूक जिंकल्यास, महापौरपदी मोहित कंबोज यांना बसवण्यात येईल, असा दावा अखिल चित्रे यांनी केला आहे. अखिल चित्रे यांच्या या दाव्यावर भाजप महायुतीकडून अजून प्रतिक्रिया आलेली नाही. पण राजकारण नक्की तापणार, असलेच दिसते आहे.

अखिल चित्रे यांनी, 'एक्स'वर पोस्ट करताना, भाजपने मुंबईत (Mumbai) आजपर्यंत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल असले अमराठी उपमहापौर दिले. त्यामुळे आज जेव्हा पत्रकार भाजप नेत्यांना विचारतात की, 'मुंबईचा महापौर मराठी असेल का?', त्यावर फडणवीस म्हणतात, 'महापौर महायुतीचाच होणार', शेलार म्हणतात, 'महापौर हिंदू होणार'. पण कुणीही छातीठोकपणे सांगत नाही की, महापौर मराठीच होणार! याचाच अर्थ त्यांचा मुंबई 'महापौर'पदाचा अमराठी उमेदवार ठरलाय, मोहित कंबोज ठरलाय! असे म्हटले आहे.

अखिल चित्रे यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, मराठी माणसा, आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचं का? धनाढ्य आहे म्हणून महायुती हुजरी असेल, पण स्वाभिमानी मराठी माणसाने, अशांना हिसका दाखवावा! असे आवाहन केले आहे.

महायुती संयमाने घेणार

मुंबई महापालिकेत भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यात युती निश्चित मानले जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद मुंबईत कमी असल्याने ते युतीबरोबरच राहणार असल्याचे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. त्यावेळी भाजपला 82, तर शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या.

फडणवीस यांची जोरदार तयारी

उद्धव ठाकरे यांना गेल्या निवडणुकीत भाजपने महापौर दिल होते. पण यंदा राजकीय परिस्थिती भाजपच्या बाजूने आहे. महायुतीत राहून मुंबई महापालिकेत संपूर्ण सत्ता मिळवण्याची तयारी भाजपने केली आहे. महापौरपदी भाजपचाच उमेदवार बसवायचा, अशी तयारी सुरू केली आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, असे सांगत आहे. पण कोण होईल, हा सस्पेन्स कायम आहे.

अखिल चित्रे यांच्या पोस्टने खळबळ

महापौरपदाचा उमेदवार कोण असेल, हे मात्र भाजपने गुलदस्त्यात ठेवलं असलं, तरी अखिल चित्रे यांच्या 'एक्स'वरील पोस्टने अन् त्यात मोहित कंबोज यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीला समोरे जाताना, ठाकरे बंधूंची युती होत आहे. त्यामुळे ठाकरे बंधूमध्ये जागा वाटप होताच, मराठी माणसाचा चेहरा महापौरपदी जाहीर करण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT