Samajwadi Party Mumbai : भाजप मंत्री नीतेश राणे यांनी दापोली इथल्या सभेत, वादग्रस्त विधानावर समाजवादी पक्ष चांगलाच भडकला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभारणीच काम करत असतानाच, मंत्री राणे देश तोडण्याचे काम करत आहे, असा घणाघात समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आणदार रईस शेख यांनी केला.
भाजप (BJP) मंत्री नीतेश राणे दापोली इथल्या सभेत वादग्रस्त विधान केले. दुकानादराला धर्म विचारून वस्तू खरेदी कराव्यात आणि त्याच्या धर्माविषयी शंका आल्यास त्याला हनुमान चालीसा म्हणायला लावावी, असा सल्ला दिला.
मंत्री नीतेश राणे यांचे हे विधान म्हणजे, धार्मिक द्वेष पसरविणारे आहे, असा घणाघात समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार रईस शेख यांनी केला. काश्मीरमध्ये पर्यटकांचा जीव वाचविताना, अतिरेक्यांच्या गोळ्यांनी मृत्यूमुखी पडलेला सय्यद आदी कोण होता, हे राणे यांनी सांगावे, असा प्रश्न आमदार शेख यांनी केला.
आमदार रईस शेख म्हणाले, "देशातील एकाही मुसलमान अतिरेक्यांच्या या भ्याड हल्ल्याचे समर्थन करत नाही. पाकिस्तानविरोधात केलेल्या भारताच्या कृतीला मुस्लिमांचा पाठिंबा आहे". हल्ल्यानंतर पर्यंटकांना मोफत टॅक्सी, अन्न आणि निवासाची सोय उपलब्ध करून देणारे स्थानिक मुसलमान होते, याकडे देखील आमदार शेख यांनी लक्ष वेधले.
अतिरेकी हल्ल्यानंतर मरण पावलेल्या पर्यटकांना जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येक मशीद आणि धार्मिक स्थळामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. याविषयी मंत्री का बोलत नाही, असा सवाल देखील आमदार रईस शेखा यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.