Ashish Shelar, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Ashish Shelar : "तुम्हाला "पेग्विन सेना " म्हणायचे का ? ; ठाकरेंच्या 'कमळाबाई' टीकेला शेलारांचं प्रत्युत्तर

Ashish Shelar : उद्धव ठाकरे यांना आशिष शेलार यांनी पत्र लिहले आहे. शेलारांनी हे पत्र टि्वट केले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे (shivsena) मुखपत्र 'सामना'तून भाजपवर केलेल्या टीकेला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (ashish shelar) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. (ashish shelar latest news)

'सामना'तून भाजपचा उल्लेख कमळाबाई असा केला आहे. झारखंड, दिल्लीमध्ये ‘ऑपरेशन लोटस’चा प्रयत्न फसल्यानंतर भाजप अर्थात कमळाबाईची वाईट नजर आता कॉँग्रेसवर पडली आहे. पक्षांतर्गत नाराजीचा फायदा घेत महाराष्ट्रात कॉँग्रेसमध्ये फूट पाडण्याची ‘हात’घाई भाजपकडून सुरू आहे, असे 'सामना'मध्ये म्हटले आहे. यावरुनच भाजप- शिवसेनेत जुंपली आहे.

शिवसेना प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आशिष शेलार यांनी पत्र लिहले आहे. शेलारांनी हे पत्र टि्वट केले आहे. 'कमळाबाई' या उद्धव ठाकरेंच्या टीकेला आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणता. मग तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला आम्ही आता "पेग्विन सेना " म्हणायचे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भाजपला भाजप न म्हणता कमळाबाई म्हणायचे. एका भाषणात बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ही कमळाबाई राहते आमच्या पक्षात पण हीचे लक्ष दुसर्‍या पक्षाकडे असते," इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा भाजप-शिवसेनेने एकमेकांची साथ सोडली. तेव्हा'कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या', असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. शिवसेनेला "पेग्विन सेना " म्हणणारे आशिष शेलार यांच्या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार, हे लवकरच समजेल.

भाजपवर आजही शिवसेनेने टीका केली आहे. 'केंद्र सरकार बेरोजगारीच्या समस्येवर समाधान शोधण्याऐवजी अर्थव्यवस्थेचा गाडा बघा कसा वेगाने धावतो आहे, याचे आभासी चित्र रंगवण्यात मशगूल आहे. जीएसटीचे संकलन कसे नवनवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे आणि देशाच्या औद्योगिक उत्पादनात कशी झपाटय़ाने वाढ होते आहे, याचे ढोल बडवणारे आकडे जाहीर करणारे सरकार बेरोजगारीच्या भयावह संकटाविषयी काहीच का बोलत नाही?, असा सवाल 'सामना'तून विचारण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT