Ganesh Naik,Rupali Chakankar
Ganesh Naik,Rupali Chakankar sarkarnama
मुंबई

भाजप आमदार नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार ; महिला आयोगाचा दणका

सरकारनामा ब्युरो

नवी मुंबई : भाजप (BJP)आमदार गणेश नाईक (Ganesh Naik)यांच्यावर बेलापूर आणि नेरुळ पोलीस ठाण्यात फसवणुक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ''गणेश नाईक यांना याप्रकरणी तत्काळ अटक करण्याची कार्यवाही लवकरच केली जाईल,'' असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)आज यांनी सांगितले. याबाबत चाकणकर यांनी समाजमाध्यमावर व्हिडिओ शेअर केला आहे.

''एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर झालेल्या अपत्याचा स्वीकार न करणारे भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,'' असे चाकणकर यांनी सांगितले.

''काही दिवसापूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी आज गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत. गणेश नाईक यांना याप्रकरणी तत्काळ अटक करण्याची कार्यवाही देखील लवकरच केली जाईल, असे चाकणकर म्हणाल्या.

नाईक यांच्यासोबत २७ वर्ष लिव्ह इन मध्ये राहण्याचा दावा फिर्यादी महिलेने केला आहे. इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राज्य महिला आयोगानेही (Maharashtra State Commission for Woman)या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

पीडित महिलने राज्य महिला आयोगाकडे केल्या अर्जामध्ये भारतीय दंड विधान 376, 420, 504, 505 अन्वये गुन्हा नोंद करुन पोलिसांकरवी संरक्षण उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती केली आहे. महिलेने केलेल्या आरोपानुसार, सदर महिला व गणेश नाईक हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. या संबंधातून त्यांना एक 15 वर्षांचा मुलगाही आहे.

गणेश नाईक यांनी आपल्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, १९९३ पासून लग्नाचे आमिष दाखवत ते सातत्याने आपले लैंगिक शोषण करीत असल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे. पीडित महिला जेव्हा गणेश नाईक यांच्याकडे लग्न करण्याबाबत विचारणा करत असे तेव्हा ते तिला जीवे मारण्याची धमकी देत. पीडितेने नाईक यांच्याकडे वैवाहीक अधिकार मागीतले या वेळी त्यांनी तिला तिच्या मुलासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनीही संबंधित महिलेने गणेश नाईक यांच्यासोबत असलेले संबंध संपवून इतर ठिकाणी निघून जावे यासाठी सातत्याने त्रास आणि धमक्या देत असल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. नाईक कुटुंबीयांच्या त्रासाबद्दल नेरुळ पोलीस स्थानकात वारंवार तक्रार देऊनही कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी पीडितेने राज्य महिला आयोगाकडे केली होती. या प्रकरणाची चैाकशी करण्याच्या सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहे, तर गणेश नाईक यांची डीएनए चाचणी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT