BJP MLA Ganpat Gaikwad, Narendra Modi, Vijay Wadettiwar Sarkarnama
मुंबई

Ganpat Gaikwad Firing : सत्तेचा माज, बंदुकीचा वापर...कुठे आणून ठेवलाय महाराष्ट्र माझा? गोळीबारानंतर वडेट्टीवारांचा संताप

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News :

सुसंस्कृत महाराष्ट्राचा महायुतीने यूपी, बिहार करून ठेवला आहे. सत्ताधारी आमदार पोलिस ठाण्यातच गोळीबार करत आहेत. सत्ताधारी आमदार पोलिसांवर हात उचलत आहेत. सत्तेचा माज, बंदुकीचा वापर, बदल्याचे राजकारण या सगळ्यांमुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकारच्या मनात नेमकं काय आहे? राज्याला अशांत करून, भीती निर्माण करून राज्य करणे हीच खरी मोदींची (Narendra Modi) गॅरंटी आहे का? असे सवाल उपस्थित करून सरकारनं राज्यातली कायदा सुव्यस्था धुळीस मिळवल्याचा हल्लाबोल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

राजकीय वैमनस्यातून भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेनेच्या कल्याण पूर्वच्या शहरप्रमुखावर गोळीबार शुक्रवारी रात्री गोळीबार केला. यावर विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ही संतप्त प्रतिक्रिया देत सरकारला धारेवर धरले आहे. Ganpat Gaikwad Firing

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी गद्दारी केली. ते भाजपसोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील. महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. 'त्यांनी माझे करोडो रुपये खाल्ले, त्यांच्या खासदार मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपुढे या सर्व गोष्टी मांडल्या. पण त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही.' महायुतीतील आमदार गणपत गायकवाड यांचे हे शब्द ऐकून महाराष्ट्रातील जनतेला या अपात्र महायुतीचे भयंकर रूप लक्षात आले असल्याची खरमरीत टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. (Crime News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारण विदारक परिस्थितीतून जात आहे. महायुतीत शीतयुद्ध सुरूच आहे. निवडणुका जवळ येतील तसे, यांचे आपापसातील वाद उफाळून येतील. पैसे कमावणे आणि जमीन हडपणे हा भू-माफियांचा उद्योग तेजीत आहे. अशा उद्योगांना राजाश्रय मिळतो हे गंभीर आहे. एकीकडे सरकारने गुंड पोसायचे आणि दुसरीकडे मात्र केंद्रीय तपास यंत्रणा विरोध करणाऱ्यांच्या मागे लावायच्या. सरकारचे हे धंदे आता जनतेच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल, असा इशारा वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे.

उल्हासनगर हद्दीतील हिललाईन पोलिस ठाण्यातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गेल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. आता आमदार गायकवाडांवर पक्ष म्हणून भाजप काही कारवाई करणार का, याकडे सर्वींचे लक्ष लागले आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT