Ganpat Gaikwad Firing : महेश गायकवाडांवर गोळीबार;'अविश्रांत श्रीकांत' कार्यक्रम रद्द...

MLA Ganpat Gaikwad : उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यातच आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.
Shrikant Shinde
Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Dombivli : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणानंतर उल्हानगरसह ठाणे जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. आज (शनिवार) श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. मात्र, गोळीबार प्रकरणानंतर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात फ्रेंड्स लायब्ररी तर्फे 'अविश्रांत श्रीकांत' हा श्रीकांत शिंदे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. (Ganpat Gaikwad Firing)

Shrikant Shinde
Lal Krishna Advani : मोठी बातमी ! लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर

उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यातच आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. महेश गायकवाड हे खासदार शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. पोलिस ठाण्यात झालेल्या या गोळीबारानंतर खळबळ उडाली. महेश गायकवाड यांच्यासह त्यांचा एक मित्र या गोळीबारात जखमी झाला. महेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महेश यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, आपल्या निकटवर्तीयावर हल्ला झाल्या असताना कार्यक्रम घेणे योग्य नसल्याने श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde ) यांनी मुलाखतीचा कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा आहे. श्रीकांत शिंदे यांची मुलाखत प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते घेणार होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महेश गायकवाड (mahesh gaikwad) आणि त्यांचे मित्र राहुल यांच्यावर आमदार गायकवाड (mahesh gaikwad) यांनी सहा गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्या महेश गायकवाड यांच्या अंगाला चाटून गेल्या तर दोन गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या. इतर दोन गोळ्या राहुल पाटलांना लागल्या आहेत. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गोळीबार प्रकरणानंतर विरोधी पक्षाकडून सरकावर टीका करण्यात येत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com