BJP MLA Ganpat Gaikwad, Prashant Bote Sarkarnama
मुंबई

MLA Ganpat Gaikwad : आमदार गोळीबार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा; शिवसेनेची मागणी

Bhagyashree Pradhan

Kalyan Crime News :

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबारामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. ज्या महेश गायकवाड यांच्यावर हल्ला झाला ते कल्याण पूर्वेकडील शिवसेनेचे (शिंदें) शहरप्रमुख आहेत. त्यातच हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी आमचा घात केला. जे पोलिस ठाणे लोकांना न्याय मागण्यासाठी आणि देण्यासाठी असते तिथे अशी घटना अपेक्षित नव्हती. काल (शुक्रवार) देखील एका जमिनीच्या प्रकरणावरून गरीब कुटुंबाला न्याय द्यायला आम्ही तेथे गेलो होतो. महेश गायकवाड पोलीस ठाण्यातच असल्याने बेसावध होते. याचवेळी आमदार गायकवाड यांनी बेछूट गोळीबार केला, असा आरोप महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांचे समर्थक प्रशांत बोटे (Prashant Bote) यांनी केला आहे.

गुन्ह्यात ज्यांची नावे आहेत आणि पोलिसांनी ज्यांना अटक केली आहे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करत आहोत. फास्टट्रॅक कोर्टात ही केस चालवावी, अशी मागणी महेश गायकवाड यांच्या खंदे कार्यकर्ते, समर्थक आणि मित्र प्रशांत बोटे यांनी केली. आमदार गायकवाडांनी गोळीबार केला तेव्हा प्रशांत बोटे पोलिस ठाण्याबाहेर हजर होते. (Crime News)

या शहराचा आमचा प्रमुख जो सगळ्यांसाठी मदतीला धावून जातो त्याला न्याय मिळावा, अशी मागणी करतानाच जनतेला कुठेही त्रास होणार नाही याची काळजी घेणार, असे प्रशांत बोटे यांनी स्पष्ट केले.

मदतीला धावणारे महेश गायकवाड

15 वर्षांपासून आमदार गायकवाड सर्वांची फसवणूक करत आहेत. मात्र आता महेश गायकवाड लोकांना न्याय देत आहेत. त्यामुळे सर्व लोक त्यांना समर्थन देत आहे. त्यामुळे आमदारांना आम्ही प्रतिस्पर्धी वाटत आहोत. आपणच कल्याणचा राजा ही आमदारांची भावना आहे. मात्र, आम्ही निस्वार्थी वृत्तीने काम करत असल्याने आमदारांना बघवले नाही, असा आरोप प्रशांत बोटे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कडक बंदोबस्त आणि दंगल पथक

गणपत गायकवाड आणि शिवसेना (शिंदे) शहरप्रमुख महेश गायकवाड यांचे कार्यालये समोरासमोर आहेत. त्यामुळे तेथे कोणताही वाद पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला आहे. तसेच दंगल पथक देखील दाखल झाले आहे. महेश गायकवाड यांच्या कार्यालयाजवळ अनेक महिला आणि त्यांचे जवळचे कार्यकर्ते, मित्र जमले आहेत. महेश गायकवाड यांच्या कर्यालयाजवळील सर्व दुकाने निषेधार्थ बंद ठेवण्यात आली आहेत.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT