BJP MLA Ganpat Gaikwad Sarkarnama
मुंबई

Thane Police : आता सगळे 'बंदुकधारी' ठाणे पोलिसांच्या निशाण्यावर

सरकारनामा ब्यूरो

Thane Crime News :

ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचीच चर्चा आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यात गोळीबार करून खळबळ उडवली. आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पिस्तुलीतून सहा राऊंड फायर केले. यात राहुल पाटील हे देखील जखमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या गोळीबारात शिवसेनेचे (शिंदे) कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) जबर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. काल त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले. तरीही खूप काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच बंदूक, रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या सर्वांच्या लायसन्सची तपासणी करण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे.

ठाण्यातील सर्व बंदूकधारकांच्या लायसन्सची (Gun License) पडताळणी करा, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. एकट्या ठाण्यात अंदाजे 4 हजार बंदुकींचे लायसन्स दिल्याची माहिती समोर येत आहे. या सर्वांची आता ठाणे पोलिसाकडून तपासणी केली जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बंदुकीचा आणि सर्वसामान्यांचा काही संबंध नसतो. मात्र, राजकीय नेते, काही समाजसेवक तसेच बिल्डर, उद्योगपती हे बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण बंदूक घेतल्यानंतर तिचा वापर कसा होतो, बंदुकधारकांच्या लायसन्सची नियमित तपासणी होतो का, याची माहिती जनतेपर्यंत कधी पोहोचत नाही.

आता कल्याण पूर्वेकडील भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलिस ठाण्यात गोळीबार केल्यामुळे बंदुकांचा वापर कोणीही, कसाही करू शकतो, या निष्कर्षावर पोलिस आले आहेत. म्हणूनच ठाण्यातील सर्व बंदुकांच्या लायसन्सची तपासणी केली जाणार आहे. ज्यांना बंदुकांची गरज नाही त्यांचे लायसन्स रद्द केले जाऊ शकतात. एवढेच नाही तर कदाचीत हा निर्णय राज्यासाठीही लागू शकतो, आणि सर्व जिल्ह्यांतील बंदुकधाऱ्यांच्या लायसन्सचीही तपासणी केली जाऊ शकते.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT