Ganpat Gaikwad Case : महेश गायकवाडांच्या तब्येतीत सुधारणा; खासदार डॉ. शिंदेंनी भेट घेत संवाद साधला

BJP MLA Ganpat Gaikwad Firing Case : आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या होत्या.
MP Dr. Shrikant Shinde
MP Dr. Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane News: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात आमदार गायकवाड यांना अटक झाली असून त्यांना बारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Bjp Mla Ganpat Gaikwad Firing Case)

गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या होत्या. महेश गायकवाड हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MP Dr. Shrikant Shinde
Ganpat Gaikwad Case : अखेर आमदारामधील बाप हतबल झाला; मुलाच्या बचावासाठी गोळीबार केला, शेवटी नको तेच घडलं

यानंतर आता कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही महेश गायकवाड यांची भेट घेत संवाद साधला आहे. श्रीकांत शिंदे यांचा महेश गायकवाड यांच्याशी संवाद साधतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत. महेश गायकवाड यांच्याबाबत हॉस्पिटलने काढलेल्या वैद्यकीय बुलेटिंनमध्ये महेश यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले आहे.

रविवारी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शहाजी पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली. पालकमंत्री देसाई म्हणाले, डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण फक्त महेश गायकवाड यांना पाहिले. त्यांच्याशी बोललो नाही. त्यांची प्रकृती काळजी घेण्यासारखी असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणी खाली उपचार सुरू आहे, असे म्हटले होते.

दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन महेश गायकवाड यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. तसेच दोघांमध्ये काही वेळ संवाद झाला. यावरून गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे. तर महेश गायकवाड हे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

MP Dr. Shrikant Shinde
OBC Leaders Meeting : मोठी बातमी ! ओबीसी समाजाची पुढची रणनीती आज ठरणार; पण भुजबळांची अनुपस्थिती ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com