Devendra Fadnavis, Eknath Shinde,Ganpat Gaikwad, Narendra Pawar Sarkarnama
मुंबई

Ganpat Gaikwad Politics : निमित्त गणपत गायकवाडांचे, निशाणा देवेंद्र फडणवीसांवर; नरेंद्र पवारांचा भाजपला घरचा आहेर

Bhagyashree Pradhan

Dombivli Political News :

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे (शिंदे) कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार. याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यावरून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी थेट भाजप नेतृत्वावर टीकेचा आसूड ओढला आहे.

कल्याण पूर्वमध्ये आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) आणि शिवसेनेचे (शिंदे) शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यातील वाद मिटवण्यात वरिष्ठ नेतृत्व कमी पडले, असा गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार (Narendra Pawar) यांनी केला आहे. हा भाजप नेत्याकडून भाजपला घरचा आहेर असल्याचे बोलले जाते. त्यांच्या टीकेचा रोख देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकड रोख होता.

अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातल्या जमिनीच्या वादातून आमदार गणपत गायकवाडांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री (2 फेब्रुवारी) पोलिस ठाण्यातच बेछूट गोळीबार केला. ही घटना गंभीर आहेच मात्र ही घटना घडण्याइतका मानसिक तणाव आमदार गायकवाड यांचावर का आला, याचाही विचार व्हायला हवा, याकडे नरेंद्र पवार यांनी लक्ष वेधले आहे. (Ganpat Gaikwad Firing issue)

वास्तविक महायुतीमध्ये समन्वय नसल्याने अनेकदा अडचणी येत असून त्याचाच हा एक भाग आहे. म्हणूनच कार्यकर्त्यांमधील वाद संपवून त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी वरिष्ठांनी प्रयत्न करावेत, घडलेली घटना गंभीर असून भविष्यातील अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नेत्यांनी यात तातडीने लक्ष घालावे आणि कार्यकर्त्यांमधील वादांना पूर्णविराम द्यावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार गायकवाडांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले असून यानंतरही सलोखा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप - शिवसेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील वादाविरोधात यापूर्वी देखील अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी गेल्या होत्या. हे वास्तव आहे आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. कारण दोन्ही पक्षांत समन्वय नाही मात्र, आता या घटनेनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्याकडे वाद संपवण्याची मागणी आपण केल्याचे नरेंद्र पवार म्हणाले.

कार्यकर्ते भरडले जाऊ नयेत!

कोर्टाबाहेर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली होती. जर समर्थनार्थ येणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होणार असतील तर कोणतेही कार्यकर्ते येताना घाबरतील. यामुळे कार्यकर्ते यात भरडणार नाहीत, याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे! आपण गोळीबारच्या घटनेचे समर्थन करत नाही, पण कार्यकर्त्यावर अन्याय नको, अशी आग्रही मागणी नरेंद्र पवार यांनी केली आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT