Ganpat Gaikwad, Mahesh Gaikwad Sarkarnama
मुंबई

Ganpat Gaikwad Firing : मोठी बातमी! भाजप आमदार गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर पोलिसांसमोरच गोळीबार

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : उल्हासनगर येथे भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात मोठा राडा झाला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाच्या कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे. उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच त्यांनी हा गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर आमदार गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहेत.

महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि गणपत गायकवाड जन्या वादाच्या प्रकरणातून उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात गेले होते. ते वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी चर्चा करत असतानाच भाजप आमदार गणपत गायकवाडांनी महेश गायकवाड यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्याचा आरोप होत आहे. त्यातील दोन महेश गायकवाड यांना तर दोन त्यांचे मित्र राहुल पाटील यांना लागल्या आहेत. जखमी गायकवाड आणि पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, आमदार गायकवाड (Ganpat Gaikwad) आणि खासदार श्रीकांत शिंदेंचे समर्थक, माजी नगरसेवक महेश गायकवाड हे नातेवाईक आहेत. मात्र त्यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून टोकाचा वाद होता. यापूर्वीही त्यांनी जाहीर सभांतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. टीका टिप्पणीनंतर एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत हा वाद पोहोचला होता. आमदार गणपत गायकवाड यांची नार्को टेस्ट नव्हे तर सायको टेस्ट करण्याची गरज आहे, अशी टीकाही शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, गेले दोन दिवस आमदार गायकवाड वादाच्या भोवऱ्यात आडकले आहेत. त्यांनी महिलांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. आता तिसऱ्या दिवशी आमदार गणपत गायकवाडांनी महेश गायकवाड यांच्यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या केबिनमध्येच गोळ्या झाडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. महेश गायकवाडांना सध्या कल्याण येथील मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ठाणे येथील जुपिटर हॉस्पिटल येथे हलवण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नजीकच्या नातेवाईकांनी दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT