Ganpat Gaikwad News Sarkarnama
मुंबई

Ganpat Gaikwad News: वाढदिवसाचे बॅनर काढल्याने आमदार गायकवाड संतापले; गांधीगिरी करत केला अधिकाऱ्यांचा सत्कार !

BJP MLA Ganpat Gaikwad: वाढदिवसाचे बॅनर काढल्याने कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले.

शर्मिला वाळुंज

Mumbai : आपल्या वाढदिवसाचे बॅनर काढल्यामुळे कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे पालिकेच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. त्यांनी गांधीगिरी करत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच अदृश्य शक्तीच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

आमदार गणपत गायकवाड यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. आमदार गायकवाड यांना शुभेच्छा देणारे बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी लावले होते. केडीएमसीच्यावतीने वाढदिवस होताच हे बॅनर काढून टाकण्यात आले.

त्यामुळे बॅनरवर कारवाई होताच आमदार गायकवाड पालिकेच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यांनी थेट प्रभागात जात पालिका अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला.

आमदार गणपत गायकवाड यांचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस सोहळा पार पडला. वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार गायकवाड यांना शुभेच्छा देणारे फलक शहरातील विविध भागात लावण्यात आले होते. पण केडीएमसीच्या ड प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीतील बॅनरवर कारवाई केली.

या कारवाईत गायकवाड यांचे बॅनर उतरविण्यात आल्याने आमदार चांगलेच संतापले. शुक्रवारी आमदारांनी केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेत गांधीगिरी करत अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

"माझे बॅनर काढले, अभिनंदन... कायदा फक्त आमदार गणपत गायकवाड यांनाच का?," असा सवाल आमदार गायकवाड यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केला. तसेच इतर बॅनर आहेत, त्यावर कारवाई कधी होणार? असे विचारले. माझेच बॅनर का काढले?, असे विचारताच अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यालयात तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे कारवाई केल्याचे उत्तर दिले. यावर फक्त माझ्याच बॅनर विषयी तक्रारी आल्या का? असाही सवाल यावेळी आमदार गायकवाडांनी केला.

दरम्यान, "राजकीय हेतूने तक्रारी केल्या जात आहेत. अदृश्य शक्तीच्या सांगण्यावरून फक्त माझ्या बॅनरवर कारवाई होते, असा टोला नाव घेता आमदार गायकवाड यांनी मित्र पक्षाला लगावला. मी पण अनेक तक्रारी केल्या, त्या बॅनरवर पण कारवाई करा. शहर स्वच्छतेकडे लक्ष द्या, मात्र, त्याचबरोबर पावसाळा आला आहे, नालेसफाईकडेही लक्ष द्या, असं आमदारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT