Bhandara BJP News : आम्हीच नारे देत होतो की, ‘जनतेच्या सन्मानात भाजप मैदानात’, पण भाजपचे प्रेम राष्ट्रवादीवर !

KCR : काल नागपुरात भारत राष्ट्र समितीच्या कार्यालयाचे केसीआर यांनी उद्घाटन केले.
Charan Waghmare
Charan WaghmareSarkarnama
Published on
Updated on

Former MLA Charan Waghmare criticizes BJP : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाय रोवणे सुरू केले आहे. काल (ता. १५) नागपुरात भारत राष्ट्र समितीच्या कार्यालयाचे त्यांनी उद्घाटन केले. त्यानंतर बीआरएसकडे काही नेत्यांचा कल वाढत चालला आहे. विशेष करून भाजपचे विदर्भातील तीन माजी आमदार आगामी निवडणूक बीआरएसकडून लढणार आहेत. (Three former MLAs will contest the upcoming elections from BRS)

भाजपमधून निष्कासीत केलेले भंडारा जिल्ह्यातील माजी आमदार चरण वाघमारे, भाजपचेच माजी आमदार राजू तोडसाम आणि दीपक आत्राम यांनी पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यात चरण वाघमारे सध्या भाजपवर चांगलेच तोंडसुख घेत आहेत. भाजपमध्ये निष्ठावान लोकांना स्थान नसल्याचे त्यांनी काल (ता. १५) माध्यमांशी बोलताना सांगितले.

वाघमारे म्हणाले, भाजपचे राष्ट्रवादीवर जास्त प्रेम आहे. आमच्या भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीसोबत युती न केल्याने भाजपने मला पक्षातून काढून टाकले. ‘जनतेच्या सन्मानात, भाजप मैदानात’ असे आम्ही नारे देत होतो. आम्हाला वाटायचे भाजपमध्ये लोकशाही आहे. परंतु आमची तिकीट कापली गेली तेव्हा जाणवले की, 'जनतेच्या अपमानासाठी, भाजप मैदानात' अशी स्थिती झाली आहे. आम्ही बीआरएस पक्षाकडून निवडणुका लढणार आहोत, असेही वाघमारे म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळत नाही. बीआरएस पक्ष राज्यात सत्तेत आल्यानंतर तेलंगणात ज्या काही योजना राबवल्या जात आहेत, त्या महाराष्ट्रात राबवल्या जातील. भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. ईडी, सीबीआयचा धाक दाखवून लोकांना लुटण्याचे काम भाजप सरकार करीत आले, असा घणाघाती आरोप चरण वाघमारे यांनी केला.

Charan Waghmare
Bhandara-Gondia News : ‘भावी खासदार’च्या बॅनरबाजीमुळे बदलली लोकसभा निवडणुकीची गणिते !

शेतकऱ्यांच्या (Farmers) सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात (Maharashtra) होतात. हा कलंक आपल्याला पुसायचा असेल तर केसीआर यांनी ज्या योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी तेलंगणात आणल्या, त्या महाराष्ट्रात राबवल्या गेल्या पाहिजे, या उद्देशाने आम्ही भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची ताकद महाराष्ट्रात दिवसागणिक वाढत आहे.

याआधी राज्यातील अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. आता भाजपच्या (BJP) माजी आमदारांनीही बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे. चरण वाघमारे यांच्यासोबतच भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम व दीपक आत्राम या विदर्भातील दोन आमदारांनीही के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com