Nitesh Rane- Manoj Jarange Sarkarnama
मुंबई

Nitesh Rane : जरांगे पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर बोलताना राणे म्हणाले मी कोणालाही सोडत नाही !

Jagdish Patil

Mumbai News : 'काही मराठा आमदार देवेंद्र फडणवीसांच्या मागेपुढे फिरतात, ज्या आमदारांना समाजाचं काही घेणं देणं नाही, अशा आमदारांना आम्ही पाडणार असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं.

जरांगे यांच्या याच वक्तव्यासंदर्भात भाजप आमदार नितेश राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी 'मी अद्याप वक्तव्य ऐकलेल नाही.मात्र मी कुणाला सोडत नाही'.असं उत्तर दिलं आहे.

प्रसारमाध्यमांनी राणे यांना जरांगे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता राणे म्हणाले, 'मी याबाबत अद्याप काहीही ऐकलेलं नाही. मात्र ते कोणत्या हिशोबाने बोललेत ते ऐकेन. त्यांच्या वक्तव्याचा अंदाज घेईन मी कोणाला सोडणारा नाही. फक्त मी माझ्या कानाने ऐकलं पाहिजे.'मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सध्या शांतता रॅली सुरू आहे. या रॅली दरम्यान विविध जिल्ह्यांना भेट देत आहेत. अशातच नांदेड जिल्ह्यात त्यांनी सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार घणाघात केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, फडणवीसांना वाटतंय की, मी मराठ्यांच्या (Maratha) काही नेत्यांना मोठं करेन, जातीकडे दुर्लक्ष करेन आणि कोणीही काही बोलणार नाही. परंतू, त्यांना एक गोष्ट समजत नाहीये की समाजबांधव आता त्यांचं ऐकणार नाहीत. मराठ्यांनी त्यांना आता सांगितलंय तुम्ही नेत्यांना मोठं करा आणि त्यांनाच घेऊन फिरा, आम्ही तुम्हाला योग्य वेळी उत्तर देऊ, अशी टीका त्यांनी आमदार नितेश राणे यांना उद्देशून केली होती.

मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पुन्हा सांगू इच्छितो, तुम्ही आमचे शत्रू नाही, आम्हाला केवळ आमच्या हक्काचं आरक्षण द्या. आम्हाला दुसरे काही नको आहे. हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी आमची मागणी आहे. राज्यातील मराठा आता मुलांना न्याय देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी का रस्त्यावर येऊ नये का? असा प्रश्न त्यांनी या रॅली दरम्यान उपस्थित केला.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT