Nitesh Rane : 'राहुल गांधी यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या'; नितेश राणे म्हणाले त्यांनी वारीत सहभागी होऊ नये

Nitesh Rane on Rahul Gandhi about pandharpur wari काँग्रेस नेता राहुल गांधी यंदा पहिल्यांदाच पंढरपूरच्या वारीत सहभागी होत आहेत. साताऱ्याचे भाजपचे माजी खासदार रणजीत निंबाळकर यांनी विरोध केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनीही राहुल गांधी यांना विरोध केला आहे.
nitesh Rane
nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Congress Leader Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी पहिल्यांदाच वारीत सहभागी होत आहेत. यावरून भाजप नेते आक्रमक झाले असून विरोध सुरू केलाय. भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील राहुल गांधी यांना विरोध करत काही गोष्टी सुनावल्या आहेत. "राहुल गांधी यांनी हिंदू समाजाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे नाराजी आहेत. त्यामुळे त्यांनी वारीत सहभागी होऊ नये.", असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, "मणिपुरची स्थिती वाईट असती, तर तिथे जाऊन राहुल गांधी यांना फोटो काढता आले नसते. लहान मुलांबरोबर फोटो काढले. हसत आहेत. खेळत आहेत. नाचत आहेत. जसं मणिपुरला जाऊन फोटो काढले, तसे आमच्या वारीमध्ये येऊन फोटो काढू नका. तशी हिंमत देखील त्यांनी करू नये. हिंदू समाजाला ते आवडणार नाही". खूप लोक वाट बघून आहेत. थांबले आहेत, हे कधी वारीमध्ये चालताय. हिंदू समाज हा त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर दुखी आहे. नाराज आहे. चिडलेला आहे. म्हणून त्यांना स्वतःच्या सुरक्षेच्या विषयी काळजी असेल तर त्यांनी वारीमध्ये चालायला येऊ नये, असा इशारा भाजप आमदार नितीश राणे यांनी दिला.

nitesh Rane
Rahul Gandhi : राहुल गांधींना संसदेत बंद करून कानशिलात मारायला हवी! भाजप नेत्याची धमकी

काँग्रेस नेते (Rahul Gandhi) राहुल गांधी यंदा पंढरपूरच्या वारीत सहभागी होत आहेत. तत्पूर्वी त्यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून केलेले भाषण गाजले आहे. भाजपचे देशात सुरू असलेल्या जातीय राजकारणावर त्यांनी जोरदार टीका केली. भाजप म्हणजे हिंदू नाही. मोदी म्हणजे हिंदू नाही. आरएसएस म्हणजे हिंदू नाही. हिंदू कधीच अहिंसा करू शकत नाही, हे सांगताना त्यांनी प्रत्येक धर्मातील अभय मुद्राचा दाखला दिला.

त्यांच्या या भाषणावर सत्ताधारी भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालक बुद्धी म्हणून असा उल्लेख केला. यावरून राहुल गांधी विरोधात देशभरात भाजप आक्रमक झाली. परंतु तोडीस तोड म्हणून काँग्रेस देखील राहुल गांधी यांच्या समर्थनात उभी आहे. यातच राहुल गांधी पंढरपूरच्या वारीत सहभागी होणार आहे. त्याला भाजपने आता विरोध सुरू केला आहे.

nitesh Rane
Assembly Session : भास्कर जाधवांनी खिंडीत गाठलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या मदतीला आशिष शेलार धावले

साताऱ्यामधील भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी राहुल गांधी यांनी वारीत सहभागी होऊ नये, असा पहिला सल्ला दिला. यानंतर भाजप आमदार नितेश राणे हे राहुल गांधी यांच्या वारीतील सहभागाला विरोध केला. हिंदू समाज नाराज असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे त्यांनी वारीत सहभागी होऊ नये, असा सल्ला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com