Prasad Lad Sarkarnama
मुंबई

जुन्या प्रकरणात प्रसाद लाड अडचणीत; उच्च न्यायालयात घेतली धाव

मुंबई महापालिकेत आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप लाड यांच्यावर असून 2014 मध्ये गुन्हाही दाखल झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कथित फसवणूक प्रकरणी भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. कारवाई होण्याच्या भीतीने लाड यांनी आपल्याला संरक्षण देण्याची मागणी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. मुंबई महापालिकेत (BMC) आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप लाड यांच्यावर असून 2014 मध्ये गुन्हाही दाखल झाला आहे. आता हे प्रकरण पुन्हा समोर आल्यानं लाड यांच्यावर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रसाद लाड हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी विशेषत: शिवसेना (Shiv Sena) विरूध्द भाजप (BJP) असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. नेत्यांवर भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोप केले जात आहेत. दररोज नवनवी प्रकरणे समोर आणण्याचा इशारा दिला जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

त्यातच प्रसाद लाड यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिकेत 2009 मध्ये भ्रष्टाचार केल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात लाड यांच्यावर 2014 मध्ये गुन्हाही दाखल झाला आहे. एका कंत्राटामध्ये फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानंतर मागीलर्षी त्यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावलं होतं.

पाच वर्षांपूर्वी या प्रकरणा तक्रार झाली होती. हे प्रकरण तेव्हाच संपलेही होते. पण आता पुन्हा हे प्रकरण उकरून काढत माझ्यावर कारवाई करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप लाड यांनी केला आहे. यापार्श्वभूमीवर लाड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण मिळण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT