राष्ट्रवादी म्हणते, `कशाची बीले, महावितरणकडेच आमचे घेणे आहे`

सक्तीच्या वसुली विरोधात आज राष्ट्रवादी वीज कार्यालयावर मोर्चा काडणार.
NCP
NCPSarkarnama
Published on
Updated on

सिन्नर : शेतीसाठी वीजपुरवठा (Power supply) अत्यावशक आहे. शासन व प्रशासनाकडून शेतकऱ्यांना (Agreeculture) न्यायिक वागणूक देणे अपेक्षित आहे. मात्र, सद्यःस्थितीत महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना हीन वागणूक दिली जात आहे. कृषी वीजबिलांची अन्यायकारक वसुली थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांनी निवेदनाद्वारे दिला.

NCP
`त्या` टाईपिंग मिस्टेकविषयी आमदारांना गृहराज्यमंत्र्यांशी चर्चेची सूचना

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमरे, राजाराम मुरकुटे आदींनी श्री. डोंगरे यांची भेट घेऊन वीज समस्यांबाबत धरणे आंदोलन करण्याबाबत निवेदन दिले.

NCP
नव्या निर्णयातून महाविकास आघाडीने केली भाजपची कोंडी!

यावेळी ते म्हणाले, सप्टेंबर २०२० पासून अनेकदा महावितरणच्या अधिकारी वर्गाकडून रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करून वीज बिलवसुली केली आहे. कृषी धोरण २०२० च्या नुसार वसूल झालेल्या रकमेच्या ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत पातळीवर व ३३ टक्के रक्कम जिल्हा स्तरावर महावितरणच्या पायाभूत सुविधांसाठी खर्च होणार होती, मात्र त्याचा कुठलाही लेखाजोखा महावितरणने मांडलेला नसून अद्याप कुठे काम झाल्याचे निदर्शनात येत नाही.

वीजपुरवठ्याचा दाब कमी असल्याने कृषी पंप सुरळीत चालत नाही. महावितरण आपल्या दारी या योजनेचे आमिष दाखवून केबलवर वीजजोडणी करून वीजबिल आकारणी केली आहे. मात्र अद्याप त्यांना खांब व तारा ओढून देण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य सिमांतीनी कोकाटे यांनी यावेळी केला.

महावितरणद्वारे करण्यात येणारी आकारणी हीच अन्यायकारक आहे. महावितरण कंपनीकडे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई निघत असल्याने होत असलेली सक्तीची वसुली आपण तत्काळ थांबवावी. अन्यथा मंगळवारी सिन्नर कार्यालयासमोर मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, संजय खैरनार सुभाष कुंभार, जयराम शिंदे, विजय काटे, सुदाम बोडके, योगेश घोटेकर, प्रशांत कर्पे, संदीप शेळके, तुषार गडाख, सोपान उगले यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com