Manoj Jarange, Prasad Lad Sarkarnama
मुंबई

BJP MLA Prasad Lad : भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे शेकडो फोन

BJP Vs Manoj Jarange : आरक्षण देण्यावरून मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर टीकेची झोड उठवित असून मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दात ते टीका करत आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण घेणार अशी भूमिका जरांगे पाटील यांची आहे..

Chaitanya Machale

Mumbai News : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांना देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन आले आहेत. लाड यांना फोनवर अश्लिल भाषेत शिवीगाळ करत बघून घेऊ अशी धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर आमदार लाड यांना धमकी देणारे शेकडो फोन आल्याचे समोर आले आहे.

मराठा (Maratha) समाजाला हक्काचे आरक्षण द्यावे यासाठी मराठा समजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे हे आंदोलन सुरु असून त्यावर राज्य सरकारकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. मात्र सगेसोयऱ्यांबाबत कोणताही निर्णय अद्यापही राज्य सरकारने घेतला नसल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आरक्षण देण्यावरून जरांगे पाटील राज्य सरकारवर टीकेची झोड उठवित असून मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर कडक शब्दात ते टीका करत आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण घेणार अशी भूमिका जरांगे पाटील यांची असून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक होते. यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंना देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील यांनी आमदार लाड यांना करप्ट म्हणत एवढे प्रेम असेल तर फडणीसांशी लग्न कर, असे सुनावले होते.

जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आमदार लाड यांना निनावी धमकीचे फोन येण्यास सुरूवात झाल्याची माहिती समोर आली आहे. या फोनवर लाड यांना अश्लील भाषेत शिवीगाळ, तसेच बघून घेऊ अशी धमकी दिली जात आहे. वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून हे फोन येत असून आत्तापर्यंत शेकडो असे धमकीचे फोन आल्याची माहिती लाड यांच्या निवटवर्तीयांनी दिली. हे फोन नक्की कोण करत आहेत, याची माहिती अद्यापही समोर आली नाही. या निनावी फोनच्या माध्यमातून धमकी दिली जात असल्याने याची तक्रार पोलिसांकडे करून धमकी देणाऱ्यांचा शोध घेण्याची तयारी आमदार प्रसाद लाड यांनी केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT