Manoj Jarange On Prasad Lad : मनोज जरांगे प्रसाड लाडांवर तुटून पडले; 'तू किती पैसेवाला-करप्ट, फडणवीसांशी...'

Maratha Reservation Shantata Rally : ठाणे जिल्हातील पोलिस भरतीत पोलिस अधिक्षकांनी कुणबी प्रमाणपत्र असलेल्या 400 ते 500 उमेदवारांना आरक्षणातून बाहेर काढून खुल्या प्रवर्गात टाकले.
Manoj Jarange, Prasad Lad
Manoj Jarange, Prasad LadSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा आग्रह धरणारे मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात शा‍ब्दिक चकमक होते.

यावरून जरांगेंना देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली होती. यावर जरांगेंनी लाड यांना करप्ट म्हणत एवढे प्रेम असेल तर फडणीसांशी लग्न कर, अशा शब्दांत समाचार घेतला आहे.

भाजप नेते लाडांना कडक भाषेत सुनावले आहे. हा कोण बांडगूळ आला आता? तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहेस हे सांगायला लावू नकोस. तू जात विकून स्वतःचं घर भरणारी औलाद आहेस. तू देवेंद्र फडणवीस यांचे पाय चाट नाही तर काहीही कर, पण माझ्या नादाला लागू नको. फडणवीस हे मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत, हे विसरू नकोस, असेही जरांगेंनी Manoj Jarange लाड यांना ठासून सांगितले.

ठाणे जिल्हातील पोलिस भरतीत पोलिस अधिक्षकांनी कुणबी प्रमाणपत्र असलेल्या 400 ते 500 उमेदवारांना आरक्षणातून बाहेर काढून खुल्या प्रवर्गात टाकले. याबाबत प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीसांना Devendra Fadnavis जाब विचारवा, असे आवाहन जरांगेंनी केले.

ते म्हणाले, एसपीने पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना ओपनमध्ये जा, नाहीतर रिजेक्ट करतो अशी धमकी दिली. असे होत असेल तर कशाला प्रमाणपत्र दिली? याबाबत फडणवीसांना जाब विचारा, असे जरांगेंनी लाड यांना सुनावले.

Manoj Jarange, Prasad Lad
Ajit Pawar NCP : लोकसभेला निराशाजनक कामगिरी; आता अजितदादांचा पहिलाच पण मोठा बदल..

फडणवीस लक्ष्य

आता मराठा समाजाचे आमदार, मंत्री मराठ्यांविरोधात बोलत असल्याकडे जरांगेंनी लक्ष वेधले. त्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. ते म्हणाले, मराठ्यांनाच मराठ्यांविरोधात उभे करू नका. तुम्हाला गोडीत सांगतोय, मराठ्यांमध्ये मारामाऱ्या लावून मजा बघू नका. आता मराठे तुमच्याकडे येतील. तुम्ही मराठ्यांच्या जीवावर मोठे झाला आहात, अशी टीकाही जरांगेंनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange, Prasad Lad
Supriya Sule : भाजपची विधानसभेची तयारी; सुप्रिया सुळेंनी कळीच्या मुद्यावरच ठेवलं बोट, म्हणाल्या...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com