Prasad Lad Latest Marathi News
Prasad Lad Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच होतील! प्रसाद लाड यांनी स्पष्टचं सांगितलं...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. पावसाचा जिल्हानिहाय आढावा घेऊन जिथं मान्सूनचा प्रभाव कमी आहे, तिथे निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित करण्यास सांगितले आहे. पण असे असले तरी या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरशिवाय होणार नाहीत, असं भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. (BJP MLA Prasad Lad Latest Marathi News)

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झालेल्या सुनावणीनंतर प्रसाद लाड यांनी ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारला वेळ मिळणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, सरकारला आता तीन ते चार महिन्याचा कालावधी मिळणार आहे. सरकारने ओबीसी आरक्षणाला न्याय द्यावा. मागील तीन वर्षाचा आढावा घेतला तर 124 टक्केच्या वर पाऊस राज्यात पडला आहे. त्यामुळे या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबर शिवाय होणार नाही, असं लाड यांनी सांगितले. (Local Body Elections Latest Marathi News)

राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पहिला पाऊस हा कोकणात व्हायचा. पण आता वातावरणात बदल होत आहे. पाऊस कुठे होईल, हे सांगता येणे कठीण आहे. या निकालावर राज्य सरकार विचार करेल. राज्य सरकारने पावसाळ्यानंतर निवडणुका घ्याव्यात अशी भूमिका मांडली होती, असे भुसे यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयात झाली सुनावणी

राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात घेता येणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून (Election Commission) सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने आयोगाला पावसाचा प्रभाव कमी असलेल्या ठिकाणी निवडणुकांचा कार्यक्रम तयार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात आयोगाला जुन-जुलैमध्येच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. (Maharshtra Latest Marathi News)

राज्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यात या निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा आयोगाकडून न्यायालयात करण्यात आला होता. या अर्जावर न्यायालयाने आयोगाला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परिस्थितीनुरूप कार्यक्रम बदल करण्याची मुभाही न्यायालयाने दिली आहे. (Supreme court local bodies election in Maharashtra)

राज्यात ज्या भागात पाऊस नाही, तिथे निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न न्यायालयाने आयोगाला केला. त्यामुळे आयोगाकडून आता जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम तयार केला जाऊ शकतो. राज्यात मुंबईसह कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे तिथल्या निवडणुका आयोग घेणार नाही, अशी शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT