Mumbai Mithi river scam investigation : मुंबईतील मिठी नदी गाळउपसा प्रकरणातील आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयाला भेट दिली.
या वेळी आमदार लाड यांनी सहसंचालकांसमोर हे प्रकरणाची अधिकची माहिती सादर करताना मिठी नदीचे धागेदोरे मुंबईपासून दुबईपर्यंत आणि दुबईपासून लंडनपर्यंत गेल्याचा दावा केला.
भाजप (BJP) आमदार लाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना एक पेन ड्राईव्ह आणि 500 पानांचा 'दस्तऐवज' दिला. त्यामध्ये या घोटाळ्यासंदर्भातील महत्त्वाचे पुरावे आणि कागदपत्रांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. आमदार लाड यांनी ‘ईडीच्या हातात पेन ड्राईव्ह बॉम्ब दिलेला आहे. सुपूर्द केलेल्या पेन ड्राईव्हमुळे अनेक खुलासे होतील. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. चौकशी खऱ्या दिशेने वळली पाहिजे आणि मिठी नदीचा गाळ खरा कोणाच्या घशात गेला, हे जनतेसमोर आले पाहिजे".
या प्रकरणाची दोन वर्षांची नव्हे, तर 15 वर्षांची चौकशी व्हावी. कारण याचे धागेदोरे मुंबईपासून (Mumbai) दुबईपर्यंत आणि दुबईपासून लंडनपर्यंत गेलेले आहेत, असा दावा करत आमदार लाड यांनी खळबळ उडवून दिली.
महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निविदा प्रक्रिया राबवते. गेल्या तीन वर्षांत तब्बल 1,150 ते 1,200 कोटी रुपयांहून अधिकचा आर्थिक घोटाळा झाला असून, त्यामुळे करदात्या मुंबईकरांची मोठी फसवणूक झाल्याचे लाड यांनी सांगितले.
काही संशयास्पद संकल्पना राबवून मिठी नदी गाळउपशाच्या कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी निदर्शनास आणून दिले. ही एक चमत्कारिक आर्थिक फसवणूक असून, संबंधित सर्व मोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून, खऱ्या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्याप्रकरणी कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून यामध्ये अभिनेता डिनो मोरियाचं नाव समोर आलं आहे. 65 कोटी रुपयांच्या या घोटाळ्याच्या चौकशीसाठी डिनो मोरियाला अंमलबजावली संचालनालयाने आतापर्यंत दोनदा समन्स बजावले आहेत.
मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापर प्रकरणात ईडीने अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर छापे टाकले आहेत. डिनो मोरिया हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.