Uddhav Thackeray and Prasad Lad  Sarkarnama
मुंबई

Prasad Lad Vs Thackeray: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बेस्ट कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड

Prasad Lad as the President of BEST Labor Union: बेस्ट कामगार संघटनेच्या पाच हजार कामगारांनी प्रसाद लाड यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केली.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असलेल्या बेस्ट कामगार संघटनेच्या दि इलेक्ट्रिक युनियनच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या ताब्यात असलेली बेस्ट कामगार संघटना भाजपच्या ताब्यात गेल्यामुळे ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

बेस्ट कामगार संघटनेच्या पाच हजार कामगारांनी प्रसाद लाड यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे ही युनियन काम करत होती. मात्र, आता प्रसाद लाड यांची या युनियनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे या पुढे ही युनियन भाजपच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे.

या कामगार संघटनेचे अध्यक्षपद हे याआधी ठाकरे गटाचे सुहास सामंत यांच्याकडे होते. पण आता प्रसाद लाड यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. याबरोबरच महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त भविष्य निधी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील आमदार लाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट मुंबई महापालिकेची तयारी करत असतानाच तब्बल पाच हजार कामगार असलेली संघटना भाजपच्या ताब्यात गेल्यामुळे ठाकरेंना याचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. मात्र, बेस्ट कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची निवड झाल्यामुळे भाजपला मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT