Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीबाबत पक्षाध्यक्ष शरद पवारांनी केलेल्या विधानानंतर आता महाविकास आघाडीत देखील राजकीय वादळ उठले आहे. पक्षात फूट पडली नसल्याच्या पवारांच्या विधानानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली की नाही हे जनता ठरवेल. मात्र, माझ्या माहिती प्रमाणे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असल्याचे राऊत म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नसून काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असल्याच्या पवारांच्या विधानानंतर आता संजय राऊतांनी थेट राष्ट्रवादीबद्दल अनेक सवाल उपस्थित करत शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत देखील फूट पडल्याचा दावा केला आहे. "राष्ट्रवादीचा अर्धा गट भाजपसोबत गेला. याला फूट म्हणायचे नाही तर काय म्हणायचे ? दोन प्रदेशाध्यक्ष आहेत, जयंत पाटील आणि सुनील तटकरे मग ही फूट नाही का ?", असा थेट सवालही खासदार राऊतांनी केला.
"शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार आहेत, पण अजित पवार गट नाही. राष्ट्रवादीचे दोन प्रदेशाध्यक्ष आहेत, मग ही फूट नाही तर काय आहे? अजित पवारांची हकालपट्टी केली, याला आम्ही फूट समजतो", असे म्हणत राऊतांनी राष्ट्रवादीसंदर्भात अनेक सवाल उपस्थित केले.
"शरद पवार कधीच भाजपसोबत जात नाहीत. दोन दगडांवर पाय ठेवून कोणी राजकारण करत असेल तर त्याला जनता उत्तर देईल. शरद पवारांनी पक्षात पडलेल्या फुटीनंतर स्वतः सूत्रे हाती घेतली आहेत. अजित पवार यांची हकालपट्टी केली याला आम्ही फूट समजतो. शरद पवारांचा मोठा गट महाविकास आघाडीबरोबर आहे. आम्ही जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली हे लोकांना देखील माहिती असल्याने लोकांमध्ये संभ्रम नाही", असेही राऊत म्हणाले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.