Pravin Darekar Sarkarnama
मुंबई

Mahayuti Politics : अजितदादांना त्यांच्या पत्नीला अन् मुलाला कुठं निवडून आणता आलं; काय गप्पा मारता, भाजप नेत्याचा टोला

BJP MLA Pravin Darekar Raigad political clash MNS Raj Thackeray NCP Ajit Pawar : राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या वादात भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उडी घेतली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : मनसेचे राज ठाकरे अन् राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या राजकीय संघर्षात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उडी घेतली. रायगड इथं माध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरेंची बाजू घेताना अजित पवार यांना सल्ला देताना जिव्हारी लागेल, असा टोला लगावला.

राज ठाकरे यांच्या विधानावर प्रत्युत्तर देणाऱ्या अजित पवार यांना टोला लगावताना प्रवीण दरेकर यांनी अजितदादांना देखील त्यांची पत्नी आणि मुलाला निवडणुकीत निवडून आणता आलेले नाही, असे म्हटले आहे.

भाजपचे (BJP) प्रवीण दरेकर म्हणाले, "दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना आपल्याकडे चार बोट राहतात, याचे भान ठेवले पाहिजे. अजितदादांना देखील त्यांच्या पत्नी निवडून आणता आलेले नाही. अजितदादांना त्यांच्या मुलाला निवडून आणता आलेले नाही. हार-जीत तर, इंदिरा गांधी यांची देखील झालेली आहे".

'अटलबिहारी वाजपेयी हारलेत, कोकणात (Kokan) नारायण राणे देखील हारलेत. मुख्यमंत्री विलासराव देशमुख देखील हारले आहेत. आता केजरीवाल हारले आहेत. त्या मुळे हारण्यावर गुणवत्ता आणि नेतृत्वाचा कस लागत नाही. नेतृत्व हे लोकाभिमुख असलं पाहिजे. लोकांनी नेता मानले पाहिजे. निवडून आले म्हणजे नेता होत नाही', असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

ठाकरे-पवार वादाचे कारण काय

राज ठाकरे यांनी काही दिवसांपू्र्वी मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना, अजित पवार यांच्या नेतृत्वावर शंका घेतली होती. आयुष्यभर काकांच्या जीवावर राजकारण करणारे अजितदादांचे विधानसभेत 43 आमदार निवडून आले. लोकांनी मनसेला मतं दिली. पण ती कुठेतरी गायब झाली. अवघ्या चारच महिन्यात लोकांचा कल इतका कसा काय बदलला? ऐतिहासिक विजयानंतर राज्यात कुठेही मोठा जल्लोष का दिसला नाही? असे अनेक सवाल राज ठाकरेंनी केले.

अजितदादांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

अजित पवार यांनी राज ठाकरेंना यावर जोरदार उत्तर दिले. म्हणाले, "जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. त्यांच्या वक्तव्याशी आम्हाला घेणे देणे नाही. तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता. लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत बसलो नाही. यावेळी आम्ही कष्ट घेतले", असे म्हणत टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT