Shraddha Murder Case : दिल्लीत हत्या झालेल्या श्रद्धा वालकर हिच्या वडिलांचा मृत्यू; मुलीच्या अत्यंसंस्काराची इच्छा राहिली अपूर्ण

Shraddha Walker father Vikas Walker Mumbai Vasai : प्रियकराने तुकडे करून मारलेल्या श्रद्धा वालकर हिच्या वडिलांचा आज मुंबईत मृत्यू झाला आहे.
Shraddha Murder Case
Shraddha Murder CaseSarkarnma
Published on
Updated on

Mumbai News : श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर यांचा हृदयविकाराने मुंबईत मृत्यू झाला आहे. ते पत्नीबरोबर वसई इथं राहत होते. विकाल वालकर हे त्यांची मुलगी श्रद्धा वालकर हिची दिल्लीत झालेल्या हत्येमुळे धक्क्यात होते.

श्रद्धा वालकर हिची दिल्लीत 2022 मध्ये तिच्या प्रियकराने शरीराचे 35 तुकडे करून हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. आफताब अमीन पूनावाला याने तिची हत्या केली होती. सध्या तो तिहारच्या तुरुंगात आहे. आफताबबरोबर रिलेशनमध्ये येण्यापूर्वी श्रद्धा आईवडिलांबरोबर मुंबई वसईत राहत होती.

दिल्लीत (Delhi) श्रद्धा वालकर हिची 2022 मध्ये दिल्लीत हत्या झाली होती. ती तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला हिच्याबरोबर लिव्ह-इन पार्टनर राहत होती. श्रद्धाच्या हत्येचा खटला न्यायालयात सुरू आहे. आपल्या मुलीला मृत्यूनंतर न्याय मिळावा म्हणून विकास वालकर न्यायालयीन खटला लढत होते. त्यांची प्रचंड धावपळ होती. श्रद्धाच्या हत्येनंतर ते सतत तणावात असायचे.

Shraddha Murder Case
Bacchu Kadu : बच्चू कडू यांचं अमरावती जिल्हा सहकारी बँकेचं अध्यक्षपद धोक्यात, विरोधकांनी केलं टार्गेट

श्रद्धा हिच्या शरीराचे तिच्या प्रियकर आफताबने 35 वर तुकडे केले होते. मध्यरात्रीनंतर तो दिल्लीतील विविध भागात हे तुकडे फेकत होता. दिल्ली पोलिसांनी (Police) हत्याचा उलगडा केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे गोळा केले. श्रद्धाच्या शरीराचे काही तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे पाहून धक्का बसेल म्हणून, पोलिसांनी त्यांच्या आईवडिलांकडे ते सोपवले नाहीत.

Shraddha Murder Case
Sujay Vikhe : थोरातांच्या घराशेजारील मैदानावर सुजय विखेंचा 'मैं हूँ डॉन' गाण्यावर डान्स...

सहा महिन्यानंतर हत्याकांड उघडकीस

लिव्ह-इनमध्ये राहत असलेल्या श्रद्धाबरोबर किरकोळ कारणावरून आफताबशी वाद झाले होते. यातून आफताबने तिचा 18 मे 2022 मध्ये गळा दाबून खून केला. यानंतर या खुनाचा तपास लागू नये म्हणून त्याने तिच्या शरीराचे तुकडे केले. या प्रकार तब्बल सहा महिन्यानंतर उघडकीस आला. श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर पोलिसांनी कसून शोध घेतला अन् देशाला हादरून सोडणाऱ्या हत्याकांड उघडकीस आले.

दिल्ली पोलिसांचा शोध

श्रद्धा हिच्या शरीराचा तुकडे दिल्लीच्या विविध भागांमधून पोलिसांनी गोळा केले. यासाठी 18 दिवस गेले. आफताब याने तुकडे छतरपूर जंगला देखील फेकले होते. श्रद्धाची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा देखील जाळला होता. अफताब याला दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या खुनात 12 नोव्हेंबर 2022 मध्ये अटक केली.

श्रद्धा हत्याकांडाचा खटला सुरू

श्रद्धाच्या वडील विकास यांनी आफताब याला फाशी व्हावी, अशी मागणी केली आहे. दिल्ली पोलिसांनी आफताबविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. दोषनिश्चितीनंतर खटला सुरू आहे. यातच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचे निधन झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com