MLA Rahul Kul Latest News, Jaikumar Gore Latest Marathi News
MLA Rahul Kul Latest News, Jaikumar Gore Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

राहुल कुल, गोरेंनी फसवणुकीचा डाव ओळखला अन् फडणवीसांनी उधळून लावला!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे. याचदरम्यान भाजपच्या (BJP) आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याच्या नावाखाली 100 कोटींची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. दौंडचे आमदार राहुल कुल आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी हा डाव उधळून लावला. (BJP Latest Marathi News)

राहुल कुल (Rahul Kul) यांचे खासगी सचिव ओंकार बाळकृष्ण थोरात यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पण त्याआधीच कुल यांच्यासह गोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अशाप्रकारचे फोन येत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला हॉटेल ओबेरॉय येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आणखी तिघांना अटक करण्यात आली.

रियाज अल्लाबक्ष शेख (वय ४१, कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (वय ५७, पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (वय ३७, पोखरण रस्ता, ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी(वय ५३, नागपाडा, मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यापैकी शेख हा आमदारांना फोन करत असल्याचे समोर आले आहे.

याबाबत राहुल कुल व गोरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पहिल्यांदा फोन आल्यानंतरच ही व्यक्त बनावट असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पोलीस आयुक्तांना याबाबत कल्पना दिली. गुन्हे शाखेला सुचना दिल्यानंतर आम्ही संबंधित व्यक्तीला बोलावले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले, असं कुल यांनी सांगितले.

आमची कुठलीही फसवणूक झालेली नाही. जो प्रकार सुरू होता तो दुर्देवी होती. अजूनही किती लोकांना फसवले आहे का, नेमका काय प्रकार आहे, याबाबत इतरांची फसवणूक होऊ नये, म्हणून आम्ही तक्रार केली. कुणीही अशा फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी आम्ही पुढे आलो, असंही कुल यांनी स्पष्ट केलं.

गोरे म्हणाले, पहिल्या फोनपासून आम्ही दोघे सोबत होतो. तेव्हाच ही व्यक्ती बनावट असल्याचे समजले होते. तेव्हाच आमच्या नेत्यांना माहिती दिली होती. आमची कुठलीही फसवणूक झालेली नाही. कुणीही अमिषाला बळी पडलेले नाही. अशा प्रवृत्तींना अटकाव झाला पाहिजे, म्हणून फडणवीसांनी पोलिसांना सुचना दिल्या होत्या. आमचा एकाच व्यक्तीश संपर्क झाला होता. इतर कुणाचाही त्यामध्ये समावेश नव्हता, असंही गोरे यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT