Ram Kadam,Nawab Malik
Ram Kadam,Nawab Malik sarkarnama
मुंबई

'ललित'मध्ये शराब आणि नवाब असायचे ; राम कदमांचा टोला

ज्ञानेश सावंत : सरकारनामा

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे पार्टीत जायचे ; आर्यन खान प्रकरणात मलिक यांनी अभिनेता शाहरून खानसोबत तोडपाणी केल्याचा आरोप भाजपचे आमदार राम कदम (MLA Ram Kadam) यांनी रविवारी केला. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडे ३ हजार कोटींचे संपत्ती असून, ती मिळविण्यासाठी कुठचे भंगार विकले, असा प्रश्नही कदम यांनी (MLA Ram Kadam) केला. ललित हॉटेलमध्ये शराब आणि नवाबही असायचे, असा टोलाही त्यांनी लगावला.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मलिक यांनी नवे आरोप केल्यानंतर कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. कदम म्हणाले, “मलिक आणि सुनील पाटील यांचे जुने संबंध आहेत. अनेक ड्रग्जमाफियांशी त्यांचे संबंध आहेत. सुनील पाटील आणि सॅम डिसुझा यांच्यातील संबंधावर मलिक फिरवाफिरवी करीत आहेत. ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटे आरोप करीत आहेत. 'एनसीबी, समोर वानखेडे यांच्याशी माझा काही संबंध नाही. या प्रकरणात भाजपपेक्षा एक नागरिक म्हणून बोलतो आहे. त्यामुळे महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या मलिका यांचा डाव खोडून काढणार आहे."

"पालकमंत्री अस्मल शेख यांना काशिफ खान पार्टील घेऊन जाणार होते. तर या दोघांचे संबंध एवढे चांगले कसे ? त्यामुळे शेख यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले पाहिजेत. कारवाईला मलिक हे वगळे वळण देत आहेत, असेही कदम यांनी सांगितले.

राष्ट्रवादीशी संबंधांबाबत सुनील पाटील यांनीच केलं 'दूध का दूध पानी का पानी'!

मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सुनील पाटील (Sunil Patil) हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हा दावा फेटाळून लावत राष्ट्रवादीचा पाटीलशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. या आरोप-प्रत्यारोपांनंतर आता सुनिल पाटील यानेच राष्ट्रवादीशी संबंधांबाबत मोठा खुलासा केला आहे. माध्यमांशी बोलताना पाटील यांनी 1999 ते 2016 पर्यंत एनसीपीमध्ये होतो. त्यानंतर माझा राजकारणाशी कधीच संबंध आला नाही, असा खुलासा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे पाटील याचा राष्ट्रवादीशी यापूर्वी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनिल देशमुख यांनी मी एकदाच भेटलो होतो. दिलीप वळसे पाटील यांना कधीही भेटलेलो नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT