Mahesh Landge-Abu Azmi  Sarkarnama
मुंबई

Winter Session 2023 : 'एनआयए'च्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करताच अबू आझमींवर भाजप आमदार तुटून पडले

Vijaykumar Dudhale

Nagpur News : पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून आमदार अबू आझमी यांनी ‘एनआयए’च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताच भाजपचे आमदार त्यांच्यावर तुटून पडले. आझमी यांनी एनआयए कारवाईचा मुद्दा उपस्थित करताच आमदार योगेश सागर, राम सातपुते, आशिष शेलार आणि महेश लांडगे यांनी बोलायला सुरुवात केली. लांडगे आणि शेलार यांनी आझमींचा मुद्दा खोडून काढला. (BJP MLAs replied to Abu Azmi who raised the issue of NIA action)

जे लोक आतंकवादी कारवायांमध्ये सामील आहेत आणि गुन्हेगार आहेत, अशांवर कारवाई व्हायलाच पाहिजे. मात्र, ‘एनआयए’च्या पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील 50 लोकांना विना वॉरंटचे पकडून नेण्यात आले आहे, असा मुद्दा आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत आज उपस्थित केला. ते बोलत असतानाच भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार लांडगे म्हणाले की, ‘एनआयए’ आणि एटीएसची माहिती खुली केली जात नाही. पण आमच्याकडे पुण्यात अशा प्रकारच्या अतिरेकी कारवाया चालू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे 18 जुलै 2023 रोजी पुण्यात येणार होते, त्याच्या एक महिना अगोदर अतिरेकी कारवायासंदर्भात ‘एनआयए’ आणि एटीएसला माहिती मिळाली होती. त्यासंदर्भात एक कारवाई केली. त्यात एक भूलतज्ज्ञ डॉक्टर होता. एका मस्जिदमधून काही अतिरेक्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

एकट्या मुंबईमध्ये नाही तर चार ठिकाणी ‘एनआयए’ने छापेमारी केली आहे. चाळीस जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये. आम्ही सर्वजण वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी देश आणि महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे, अशी मागणी लांडगे यांनी केली.

आशिष शेलार म्हणाले की, खारमधील हनुमान नगर झोपडपट्टीची वसाहत आहे. तिच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव 15 वर्षे प्रलंबित होता. हनुमान नगरच्या विकसकाने त्याचे लिंकिंग ओशिवारा येथे दुसऱ्या ठिकाणी केले. खारमधील लोकांना ओशिवारामध्ये जाण्यासाठी बाध्य करण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात इरफान नावाच्या एका गृहस्थाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अशा इरफानच्या बाजूने बोलण्याऐवजी आबू आझमी हे ‘एनआयए’ने ज्यांना आरोपी केले, अशा लोकांच्या बाजूने बोलत आहेत. आझमी यांचे म्हणणं रेकॉर्डवरून काढून टाकावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT