Sujay Vikhe Vs Sangram Jagtap Sarkarnama
मुंबई

Ahmednagar Politics : सुजय विखेंनी 'घड्याळा'कडे पाहावं; जगतापांनी निमंत्रणाची 'वेळ' साधली !

Sujay Vikhe Vs Sangram Jagtap : "...त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उरत नाही." नगरचा पॅटर्नच वेगळा...

Chetan Zadpe

Ahmednagar Politics : भाजपचे खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार अरुण जगताप यांना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. अरुण जगताप यांना हे आमंत्रण असले, तरी खासदार विखेंचा रोख हा आमदार संग्राम जगताप यांच्या दिशेने होता. या आमंत्रणावर आमदार संग्राम जगताप यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत खासदार विखेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. (Latest Marathi News)

'खासदार विखेंचे हे आमंत्रण म्हणजे सहज केलेला विनोद आहे. आमचे नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे महायुतीत, म्हणजेच भाजपबरोबर सत्तेत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उरत नाही, असे म्हणत खासदार विखे यांनीच राष्ट्रवादीमध्ये यावे, असे आमदार जगताप म्हणाले.

आता हे आमंत्रण विनोद म्हणून देत नसून, गांभीर्याने देत आहे. विखेंनी राष्ट्रवादीकडूनच पुढच्या लोकसभेचे प्रतिनिधित्व करावे. अजित पवार यांच्याकडे मी त्यांना घेऊन जाईल. खासदार विखे यांनी पूर्वी राष्ट्रवादीमध्ये येण्याचादेखील प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्यात वाढते संघटन आणि खासदार विखेंचा कामाचा आवाका पाहिल्यास ते लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून यशस्वीदेखील होतील, असेही आमदार जगताप म्हणाले.

खासदार विखे यांनी आमदार जगताप यांना भाजपमध्ये येण्याचे जाहीर आमंत्रण दिले होते. यावरून भाजप संघटनेमध्ये पसरलेली अस्वस्थता पसरली होती. आता जगताप यांनी विखेंना राष्ट्रवादीमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये या दोघा नेत्यांचे नेमके चाललेय काय, असा प्रश्न पडला आहे. जगताप यांच्या आमंत्रणावर विखे काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

लवकरच जबाबदारी वाढणार -

'राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नवरात्र उत्सवादरम्यान होत आहे. तशी चर्चा सुरू आहे. परंतु यात राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा येतील, हे सांगता येत नाही. आताही काम करत आहे. मंत्रिपद भेटल्यास कामाचा वेग वाढेल. मात्र, मंत्रिपदावर संधी मिळेल, याची खात्री नाही. परंतु, लवकरच जबाबदारी वाढेल हे मात्र नक्की', असे आमदार संग्राम जगताप म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT