Ahmednagar Crime News : राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या खुनात भाजप नगरसेवकावर दोषारोपपत्र; अधिवेशनात गाजले होते प्रकरण...

Ahmednagar Crime News : नगरसेवक स्वप्निल शिंदेसह आठ जणांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
Ahmednagar Crime News
Ahmednagar Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : नगर शहरातील सावेडीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी अंकुश चत्तर याच्या खुनात भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक स्वप्निल शिंदेसह आठ जणांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोषारोपपत्रात चार अल्पवयीन मुलांचादेखील उल्लेख आहे. अंकुश चत्तर याचा सावेडीतील एकवीरा चौकात 15 जुलैला निर्घृण खून झाला होता. (Latest Marathi News)

Ahmednagar Crime News
Mahur Market Committee : बाजार समितीच्या पराभवाला जबाबदार कोण? भाजप की आमदार भीमराव केराम

भाजपचा नगरसेवक स्वप्निल शिंदे, अक्षय हाके, अभिजित बुलाख, महेश कुर्‍हे, सूरज ऊर्फ विकी कांबळे, मिथुन धात्रे, राजू फुलारी आणि अरुण पवार या आठ जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब सोमवंशी यांनी फिर्याद दिली आहे. या खुनाचा तपास सुरुवातीला तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे करत होते. गुन्ह्याच्या गांभीर्यामुळे हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

भाजपचा नगरसेवक स्वप्निल शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात खून, खुनासह जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, अशा स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. अभिजित बुलाखदेखील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. महेश कुर्‍हे, मिथुन धोत्रे या दोघांविरोधातदेखील गुन्हे दाखल आहेत. या आरोपींविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचीदेखील मागणी फिर्यादी यांनी केलेली आहे. गुन्ह्यातील आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

Ahmednagar Crime News
NCP Ajit Pawar Group : अजित पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीसपदी लतिफ तांबोळी यांची नियुक्ती

नगरच्या सावेडी भागात ओंकार भागानगरे आणि अंकुश चत्तर खून प्रकरणात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पावसाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच घेरले होते. बाळासाहेब थोरात यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. देवेंद्र फडणवीस यांना यावर उत्तर द्यावे लागले होते. मृत अंकुश चत्तर याच्या नातेवाइकांनी आमदार संग्राम जगताप यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी केली होती. तसेच, या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली होती.

(Latest Marathi News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com