Ujjwal Nikam vs Congress Sakarnama
मुंबई

Ujjwal Nikam Congress criticism : 'हरलो तरी मी विझलो नव्हतो'; खासदार उज्ज्वल निकम यांचा टोला

BJP MP Ujjwal Nikam Criticizes Congress in Mumbai : भाजप खासदार वकील उज्ज्वल निकम यांनी काँग्रेसवर मुंबईतील एका कार्यक्रमात टीका केली आहे.

Pradeep Pendhare

Ujjwal Nikam vs Congress : राष्ट्रपती नियुक्त खासदार होताच, पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमातून खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

'जरी मी निवडणूक हरलो होतो, तरी मी विझलो नव्हतो, पण ‘त्यांना’ हे कळले नाही', असा टोला खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी काँग्रेसला लगावला. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याविरोधात उज्ज्वल निकम भाजपकडून लढले होते. यात निकम यांचा पराभव झाला होता. आता निकम यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक मानांकन मिळण्याच्या कार्यातील योगदानाबद्दल भाजपचे (BJP) सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार यांचा आणि राज्यसभेत नियुक्ती झाल्याबद्दल ॲड. उज्ज्वल निकम यांचा सांताक्रूझ इथं भाजप उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातर्फे सत्कार करण्यात आला.

उज्ज्वल निकम म्हणाले, "मुंबई (Mumbai) महापालिकेची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. कार्यकर्त्यांनी खोट्या गोष्टी आणि अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध राहायला हवे. भाषेच्या नावाने अशाच खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत". लोकसभा निवडणुकीत मला काँग्रेसने देशद्रोही ठरवले. मला त्या रात्री झोप लागली नाही. न्यायालयात जाऊन मी त्यांच्या विरोधात लढलो असतो. पण त्याने आरोप करणाऱ्यांनाच अधिक प्रसिद्ध मिळाली असती म्हणून मी टाळले, असेही निकम यांनी म्हटले.

सांताक्रूझ इथं झालेल्या कार्यक्रमाला आमदार ॲड. पराग अळवणी, संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे, सुशम सावंत, महेश पारकर, ॲड. दीनानाथ तिवारी आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप मंत्री शेलार यांचा पवारांना टोला

राज्यसभेवर पाठवण्याची वेळ आली, त्या वेळी शरद पवार यांच्या पक्षाने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब आणि अन्य देशविरोधी खटल्यातील आरोपींची बाजू घेऊन लढणाऱ्या वकिलाला राज्यसभेत पाठवले. तर भाजपने याकूब, कसाबला फाशीची शिक्षा व्हावी, म्हणून लढणाऱ्या मुंबईकरांच्या वकील ॲड. उज्ज्वल निकम यांना पाठवले. हा फरक असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT