Ameet Satam On BMC election Sarkarnama
मुंबई

Ameet Satam On BMC election : 'कोण एकत्र येतं ते महत्त्वाचं नाही, मराठी माणसांसाठी कोणी काय केलं ते..'; अमित साटमांनी मुंबईचा महापौर कोण होणार हे सांगितलं!

Ameet Satam on Thackeray Brothers Alliance, Mahayuti Strategy & Mumbai Mayor in BMC Elections : मुंबई महापालिका निवडणूक महायुतीत किती नगसेवक निवडणूक येणार अन् महापौर कोण होणार, यावर भाजपचे मुंबई शहराध्यक्ष अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

BJP Mumbai President Ameet Satam : मुंबईत भाजपने संघटनात्मक बदल करता आमदार अमित साटम यांना भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी विराजमान केलं. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत यश खेचून आणणं हे, आमदार साटम यांच्यासाठी आव्हान असणार आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी मुंबईत भाजप, महायुतीचे किती नगरसेवक निवडून येणार, महापौर कोणाचा होणार, भाजप मुंबईतील मराठी माणसांसाठी काय करत आहे अन् मराठी माणसांकडून भाजपला किती अपेक्षा यावर भाष्य करताना ठाकरे बंधूंच्या युतीचा काहीच परिणाम होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.

दोन्ही ठाकरे एकत्र आहेत. किती आव्हान असेल, यावर बोलताना आमदार अमित साटम म्हणाले, "अगोदर एकत्र होतोच ना! मग वेगळे का झाले? कोण एकत्र येतंय, कोण एकत्र येत नाही, हे महत्त्वाचं नाही. मुंबईकरांनी (Mumbai) गेल्या 11 वर्षांत घडलेले क्रांतीकारक बदल, मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, सीसीटीव्ही कॅमरे, बीडीडी चाळीतील लोकांना घरांच्या चाव्याचं वितरण, ही सगळी कामं मुंबईकरांनी डोळ्यांनी पाहिली आहेत." त्यामुळे कुणी एकत्र आलं, कुणी एकत्र आलं नाही, समोर कोण काय बोलतं आहे, याची पर्वा न करता मुंबईकर आपले आशीर्वाद महायुतीच्या पाठीशी देतील, असा विश्वास आमदार साटम यांनी म्हटले.

मराठीचा मुद्दा अन् मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असेल. त्यावर बोलताना भाजप (BJP) अमित साटम यांनी, "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राप्त करून दिला. बीडीडी चाळीत राहणाऱ्या मराठी माणसाला देंवेंद्र फडणवीस यांनी घर दिलं. अभ्युदयनगरचा विकास देखील प्रगतीपथावर आहे. मुंबईमधून मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही. मुंबईत घर देणार ही फक्त घोषणा नाही, काही लोकं फक्त मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली की, त्यांचं मराठीचं बेगडी प्रेम उफाळून येतं." मराठी माणसांच्या जीवनात कुणी बदल घडवून आणले असतील, तर ते देवेंद्रजींनी आणि महायुतीने. मराठी माणूस सर्व काही जाणतो त्यामुळे आता खोट्या प्रचाराला मराठी माणूस बळी पडणार नाही. गेल्या 11 वर्षांत मराठी माणसांचा विकास केला, प्रगतीपथावर नेलं, त्यांनाच मराठी माणूस मतदान करेल, असा विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केला.

मुंबई महापालिकेत महापौर भाजप की महायुतीचा बसणार, यावर बोलताना आमदार अमित साटम यांनी सावध प्रतिक्रिया देताना, मुंबई महापालिकेत महापौर महायुतीचाच बसेल, असे सांगितले. 2017 मध्ये ठाकरेंना महापौरपद दिलं होतं. तसाच काही निर्णय 2025 मध्ये होईल का? यावर बोलताना, 'कुठल्या पक्षाचा महापौर होतो, हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे, महायुतीचा महापौर होईल. मुंबईकरांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी महायुतीचा महापौर करायचा आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचा महापौर होईल, हा काही चर्चेचा विषय नाही. मुंबईकरांचं स्वप्न साकार करणारा महायुतीचा महापौर होईल,' असे अमित साटम यांनी सांगितले.

2017 च्या निवडणुकीत मुंबईत भाजपच्या 82 जागा होत्या. आता पुढं कसं जाणार? काय रणनीती असणार? यावर बोलताना आमदार साटम म्हणाले, 'येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे 150 पेक्षा जास्त नगरसेवक निवडणूक देण्याचा निर्णय मुंबईकरांना निश्चय केलेला आहे. त्यामुळे महायुतीची महापौर मुंबई महापालिकेत 150 पेक्षा जास्त नगसेवकांच्या जोरावर प्रवेश करेल."

मुंबईकरांचे आभार मानतो. येणाऱ्या काळात भाजपाच प्रत्येक कार्यकर्ता मुंबईकरांच्या घरी जाऊन आशीर्वाद घेईल. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्याचा प्रयत्न असेल. महायुतीचा महापौर कसा होईल, यावर भर असेल. भाजपमध्ये कार्यकर्ता हा केंद्रबिंदू असतो. मुंबईकर भाजपकडे खूप आशेने पाहत आहे. त्यामुळे आम्ही एकसंघ म्हणून काम करणार आहोत. मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप मुंबईत एक टीम म्हणून मैदानात उतरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT