
Sangamner political rally news : शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संगमनेरमध्ये झालेल्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली. विशेष करून, गेल्या आठवड्यात संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या कीर्तनात झालेल्या राजकीय गोंधळावर, एकनाथ शिंदे यांनी थेट इशाराच दिला.
"वारकऱ्यांचा मुद्दाम सन्मान केला. वारकरी, कीर्तनकार महाराष्ट्राची ताकद आहेत. वारकऱ्यांच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कुणी करू नये. वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कुठं फेडणार हे पाप. हिंदू धर्माचा, सनातनाचा अपमान सहन करणार नाही. महाराष्ट्राचा हा भगवा शिवरायांचा आहे. स्वाभिमानाचा आहे," असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला.
संगमनेरमधील (Sangamner) शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाचे आणि आभार सभेत शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या घुलेवाडीतील कीर्तनातील राजकीय गोंधळानंतर एकनाथ शिंदे यांची आज होत असलेल्या सभेकडे लक्ष लागले होते.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "अमोल जायंट किलर ठरला, त्याचे अभिनंदन. पण संगमनेरकरांनी 40 वर्षांची सत्ता उलथवून लावली, त्यासाठी त्यांचे खास अभिनंदन. विधानसभा निवडणुकीत अमोलला खबऱ्या, खेळणं, असे म्हटलं गेलं. पण अमोलनेच तुमच्या हातात खुळखुळा दिला आहे. आता बसा खुळखुळा खेळत. अमोल काम करेल. त्याची खबर तुम्ही घेत राहा." या विजयामुळे अमोल हा दिल्लीत देखील माहित पडला आहे, याचा अभिमान आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी स्टेजवर वारकरी कीर्तनकारांचा सत्कार करण्यात आला होता. याचा धागा पकडत एकनाथ शिंदे म्हणाले, "वारकऱ्यांचा मी मुद्दाम सन्मान केला. वारकरी, कीर्तनकार महाराष्ट्राची ताकद आहे. वाकऱ्यांनाच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कुणी करू नये. वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कुठं फेडणार हे पापा. हिंदू धर्म, सनातनाचा अपमान सहन करणार नाही. भगवा शिवरायांचा आहे. स्वाभिमानाचा आहे, हे लक्षात ठेवा."
'माझा मुलगा खासदार श्रीकांत हा डाॅक्टर आहे. पण मी नाही. परंतु मी वेगळा डाॅक्टर आहे. चांगले, चांगले आॅपरेशन करतो. संगमनेरकरांनी मोठं आॅपरेशन केलं आहे. 40 वर्षे सगळ त्यांचंच. साखर कारखाना, काॅलेज माझेच. साखर माझीच, दूधपण माझं. बिस्किटपण माझं. चहा माझाच. जनतेला काय? धतुरा! पण अमोल खताळ मेवावाला माणूस नाही, हा सेवा करणारा माणूस आहे. वेडे झालेत फार! 440 चा झटका दिलाय, त्यातून ते बाहेर येतच नाही', असा टोला एकनाथ शिंदेंनी थोरातांचे नाव न घेता लगावला.
'संगमनेरच्या कारखान्यातून हजारो पोतींची साखर चोरीला गेली. ती कुठं गेली. असे म्हटलं जातं की, वेड्याच्या जत्रेत पेढ्याचा पाऊस. राहुल गांधी पळत आहे. हे वेड्यामागं पळत आहेत. पेढ्याचा पाऊस मात्र पडणार नाही. संगमनेरमध्ये कामाच्या माध्यमातून अमोल खताळ विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही. महायुती बोगद्यातून साखर पळवणारी नाही. लोकांच्या तोंडात गोड-धोड घालणारी आहे', असेही टोलेबाजी एकनाथ शिंदे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.