aditya thackeray, Nitesh Rane sarkarnama
मुंबई

Nitesh Rane : राणेंना त्यांच्या मंत्रालयाचा फुलफॉर्म येतो का ? ठाकरेंच्या प्रश्नाला राणेंचं प्रत्युत्तर

Nitesh Rane : .आदित्य यांनी आपलं फुल नाव “पुरुषाच्या “ आवाजात बोलून दाखवावं,"

सरकारनामा ब्युरो

Nitesh Rane :राणे कुंटुब आणि शिवसेना नेते यांच्यात नेहमी शाब्दीक युद्ध होणे, हे नवीन नाही. आदित्य ठाकरे यांनी भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नुकतीच खिल्ली उडवली होती. त्याला भाजपनेते, आमदार नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. (nitesh rane challenge aditya thackeray)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी एका कार्यक्रमात नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. "नारायण राणेंनी विविध पक्षात जाऊन विविध पदे भोगली, त्यातील एक चांगले काम त्यांनी सांगावे, किंवा त्यांच्या खात्याचा फुलफॅार्म सांगावा," अशी जहरी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. ते माध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानानंतर नितेश राणेंनी त्यांना त्यांच्या खास भाषेत उत्तर दिले आहे. टि्वट करीत राणेंनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "राणे साहेबांना त्यांच्या मंत्रालयाचा फुलफॉर्म येतो का हे विचारण्या अगोदर..आदित्य यांनी आपलं फुल नाव “पुरुषाच्या “ आवाजात बोलून दाखवावं,"

"उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता संपली असून ठाकरेंचे राजकारण आता मातोश्रीपुरते शिल्लक राहिले आहे. ठाकरे यांच्याकडे असलेल्या आमदारांपैकी ४ जण माझ्या संपर्कात आहेत," असा दावा नारायण राणे यांनी शनिवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना केला. राणे म्हणाले, "शिवसेनेत आता काय राहिले आहे? आमदार, खासदार फुटले आहेत. आता जी काही सेना आहे, ती मातोश्रीपुरती सीमित आहे. यापुढेही यापेक्षा वेगळे काही होणार नाही. उर्वरित काही आमदार आमच्या संपर्कात आहेत,"

"पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. १० लाख जणांना नोकऱ्या द्यायच्या आहेत. त्याचा पहिला टप्पा आज असून, देशात शासनाच्या विविध विभागांतर्गत ७५ हजार २२६ जणांना नोकऱ्या दिल्या आहेत," असे राणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT