गांधी कुटुंबाला मोदींकडून मोठा झटका ; RGF चा परवाना रद्द, काँग्रेसच्या बड्या नेत्यांची ED कडून चौकशी ?

Rajiv Gandhi Foundation : मोदी सरकारचा कारवाईचा हा पहिला टप्पा आहे, हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर ईडीकडून चौकशीची शक्यता नाकारता येत नाही.
( Rajiv Gandhi Foundation latest news)
( Rajiv Gandhi Foundation latest news)sarkarnama
Published on
Updated on

Rajiv Gandhi Foundation: गांधी परिवाराच्या संबधीत एका सामाजिक संस्थेवर मोदी सरकारने रविवारी कारवाई करीत गांधी परिवाराला मोठा झटका दिला आहे. . ( Rajiv Gandhi Foundation latest news)

कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी अध्यक्षा असलेल्या राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना (FCRA License) मोदी सरकारने रद्द केला आहे. एका चौकशी अहवालानंतर केंद्र सरकारने ही कारवाई केली. RGF च्या ट्रस्टीची चौकशी तपास यंत्रणा करणार असल्यामुळे कॉंग्रेसचे बडे नेते अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही

राजीव गांधी फाउंडेशनला (RGF) मिळालेल्या विदेशी निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर मोदी सरकारने कारवाईचे हे पहिले पाऊल उचलले आहे. या कारवाईमुळे आता या राजीव गांधी फाउंडेशनला कुठलाही विदेशी निधी (Foreign Contribution (Regulation) Act) मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

( Rajiv Gandhi Foundation latest news)
भाजप-शिंदे गटाच्या टार्गेटवर Bhaskar Jadhav का ? : शिवसेनेचा बालेकिल्ला कमकुवत करायचा ?

गेल्या अनेक वर्षापासून या फाउंडेशनला मिळालेल्या निधीत हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. याची चौकशी दोन वर्षापासून सुरु होती. आत्तापर्यंत राजीव गांधी फाउंडेशनमध्ये झालेल्या सर्व व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे.

राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून ९० लाख रुपये मिळाले होते. नियम डावलून हा निधी फाउंडेशनला मिळाला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर गृहमंत्र्यालयाने याच्या चौकशीस सुरवात केली होती.

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी मंत्री पी चिदंबरम ,राहुल गांधी ,प्रियंका गांधी वाड्रा आदी या राजीव गांधी फाउंडेशनचे ट्रस्टी आहेत. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी या फाउंडेशनची १९९१ स्थापना करण्यात आली होती. आरोग्य, साक्षरता, महिला-बाल विकास, पंचायत राज,विज्ञान-तंत्रज्ञान, संशोधन आदी क्षेत्रात या संस्थेचे काम सुरु आहे.

मोदी सरकारचा कारवाईचा हा पहिला टप्पा आहे, दुसऱ्या टप्यात हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर ईडीकडून राजीव गांधी फाउंडेशनच्या चौकशीची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com