BJP Nitesh Rane Slams Aaditya Thackeray : ठाकरे गटाचे नेते, माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. "एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते," असं विधान आदित्य ठाकरेंनी केलं आहे. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केले. तुरुंगाच्या भीतीने ते मातोश्रीवर येऊन रडलेही होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी हैद्राबादमधील गितम विद्यापीठाने आयोजित कार्यक्रमात नुकताच केला आहे.
महाराष्ट्रातील राजकारण, पर्यावरण, शिवसेना याबाबत या कार्यक्रमात त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी हा गौप्यस्फोट केला. ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी आदित्य यांचे जुने प्रकरण पुन्हा उकरुन काढले आहे.
“जेलच्या भीतीने शिंदेसाहेब भाजपाबरोबर गेले, मग पेंग्विन आणि UT यांनी (उद्धव ठाकरे) दिशा सालियनच्या खटल्याच्या भीतीने कोणा-कोणाचे हात पाय पकडले. गप्प करायला कोणाला किती पैसे दिले? हा पण गौप्यस्फोट करायला लागेल, लवकरच. ‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी हैं”, असे टि्वट नितेश राणे यांनी केले आहे. (Latest Political News)
नितेश राणे यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा उकरून काढले आहे. याप्रकरणावरून त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुशांतसिंह राजपूत व दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या घटनांचा पुनरुच्चार करत लवकरच मोठा गौप्यस्फोट करावा लागेल असा इशारा दिला आहे.
(Edited By Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.