Eknath Shinde VS BJP  sarkarnama
मुंबई

Eknath Shinde VS BJP : भाजपची मोठी खेळी, एकनाथ शिंदेंना सत्तेत वाट नाही? महापौर, उपमहापौर पद सोडण्यास नकार!

BMC Power Struggle Eknath Shinde : मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मात्र, भाजप नेत्यांकडून एकनाथ शिंदेंना मुंबईच्या सत्तेत वाट देण्यास नकार दिल्याच्या चर्चा आहे.

Roshan More

BMC Politics : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता स्थापन होणार आहे. सात फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मात्र, त्या पूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उपमहापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपद देण्यास विरोध केला आहे.

महापौर भाजपचा होणार असल्याचे स्पष्ट असताना उपमहापौर आणि स्थायी समिती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपने कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये महापौर पदावरील दावा सोडत शिंदेंचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे आता शिंदेंना मुंबईच्या सत्तेल वाटा देऊ नये, असे युक्तीवाद भाजपमधील काही नेते करत आहेत.

मुंबई महापालिकेत भाजपला 89 तर शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची गरज लागणार आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रित गट नोंदणी करून सोबत असल्याचे दाखवून दिले होते. मात्र, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये भाजपने केलेल्या त्यागाच्या बदल्यात शिंदेंना उपमहापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्ष पद देऊ नका, अशी भूमिका भाजपमध्ये मांडण्यात येत आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री घेणार निर्णय

मुंबईतील सत्तेमध्ये शिंदेंना उपमहापौर आणि स्थायी समिती देण्याला विरोध होत आहे. मात्र, या बाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे जण चर्चा करून यावर अंतिम निर्णय घेतील, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT