<div class="paragraphs"><p>Uddhav Thackeray, narayan rane</p></div>

Uddhav Thackeray, narayan rane

 

sarkarnama

मुंबई

ठाकरे सरकार सुडबुद्धीनं राणेंना जेरीस आणतयं!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. यावरुन राजकारण पेटलं आहे. या नोटीशीनंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासोबत भाजप आहे, असे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही ठाकरे सरकारवर (thackeray govt) टीका केली आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, ''विधानभवनाच्या पायऱ्यांवर जो प्रकार झाला तो निंदनीय आहे. सरकार नारायण राणे, नीतेश राणे यांना सूडबुद्धीने जेरीस आणत आहेत. ठाकरे सरकारकडून पोलिसांवर दबाव आणला जात आहे. जिल्हा बँक ही राणेंच्या हातातून जाईल म्हणून हा दबाव आणला जात आहे,''

''राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते तेव्हाच नीतेश राणे यांना अटक करायची असं ठरलं असावं. सरकार पुरस्कृत हा कार्यक्रम आहे. पोलिस हे कुणाचे खासगी नोकर नाहीत. केंद्रीय मंत्री म्हणून काही प्रक्रिया आहेत. राणेंवर कारवाई करायची आहे, अशी भूमिका ठरलेली दिसते,'' असे दरेकर म्हणाले.

दरेकर म्हणाले, ''ज्यावेळी पोलीस प्रत्यक्षदर्शी जाब घेतील तेव्हा नारायण राणे उत्तर देतील. उद्या नितेश राणेंवर हल्ला झाला असता किंवा त्यांना जेरबंद केले असते तर त्याला कोण जबाबदार राहणार. कायद्यानुसार योग्य ती प्रक्रिया राणे करतील असं वाटते. देशाच्या कॅबिनेट मंत्र्याना असे अपमानित करणे चुकीचे आहे. ही कारवाई सुडाने होत आहे.अनेक संकट आली तरी नारायण राणे यांनी फिनिक्स पक्षाप्रामाणे भरारी घेतली आहे. राणेंना भाजपपासून वेगळे करता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी राणेंकडे मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. भाजप राणेंच्या सोबत काल होती आजही आहे,''

नारायण राणे गैरहजर

नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना नीतेश यांच्या ठावठिकाण्याबद्दल वक्तव्य केले होते. नीतेश हे गायब असून, ते कुठे आहेत, या प्रश्नावर राणे यांनी वक्तव्य केले होते. नीतेश राणे कुठे आहेत, हे मी सांगणार नाही. मला माहिती असले तरी मी ते तुम्हाला का सांगू, असे विधान नारायण राणेंनी केले होते. राणेंना त्यांचे पुत्र कुठे आहेत, हे माहिती असूनही ते सांगत नाहीत, असा अर्थ पोलिसांनी काढला आहे. त्यामुळे त्यांना आज दुपारी 3 वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली होती. राणे पोलिस ठाण्यात गैरहजर राहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT