सगळे अधिकार मंत्र्यांकडे? विद्यापीठांचा सत्यानाश होईल ; वाघ भडकल्या

सरकारच्या विधेयकामुळे राज्यपालांचे अधिकार कमी होणार आहेत. विद्यापीठांवर अंकुश ठेवण्यासाठी प्र-कुलपतीपद निर्माण करण्यात येणार आहे. या प्र-कुलपतीपदी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असणार आहेत.
 Chitra Wagh

Chitra Wagh

sarkarnama

मुंबई : विद्यापीठ कायद्यात बदल करणारे विधेयक (University Law Amendment Bill) ठाकरे सरकारने विधानसभेत मंजूर करून घेतले आहे. भारतीय जनता पक्षाने या विधेयकाला विरोध केला होता. राज्य सरकारच्या या विधेयकामुळे आता राज्यपालांचे अधिकार कमी होणार आहेत.

राज्यातील विद्यापीठांवर अंकुश ठेवण्यासाठी प्र-कुलपतीपद निर्माण करण्यात येणार आहे. या प्र-कुलपतीपदी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असणार आहेत. त्यामुळे विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती आता थेट राज्यपाल करू शकणार नाहीत. या विधेयकाला भाजपकडून विरोध केला जात आहे.

विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून सभागृहात ठाकरे सरकारवर आगपाखड केलेल्या विरोधकांनी हा मुद्दा हातात घेऊन रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतला आहे. या कायद्यातून सरकारला काय साधायचे हे दाखवून देत, नव्या वर्षात राज्यभरातील विद्यापीठांत आंदोलन करण्याचा निर्णय विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जाहीर केला.

<div class="paragraphs"><p> Chitra Wagh </p></div>
भाजप जिल्ह्याध्यक्षांसह ५० जणांवर गुन्हा ; जुगार अड्ड्यावर छापा

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही या कायद्यातील बदलांबाबत आक्षेप नोंदवला आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी टि्वट करुन या विधेयकावर टीका केली आहे. ''विद्यापीठांना सरकारी महामंडळ करण्याचं काम सुरू आहे. विद्यापीठांवर सरकारचा ताबा आणला जात असून सगळे अधिकार थेट मंत्री घेत आहेत. यामुळे विद्यापीठांचा सत्यानाश होईल. तुमच्या PA कडे रांगा लागतील. मर्जीनुसार कोर्सेस तयार केले जातील,'' असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांना (Uday Samant) पदवीप्रदान समारंभाचा ड्रेस खूप आवडत असल्यानेच त्यांनी विद्यापीठाचे अधिकार आपल्याकडे ठेवल्याचा चिमटा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सामंतांना काढला आहे.

<div class="paragraphs"><p> Chitra Wagh </p></div>
भाजपची अवस्था 'शरीर मांजराचे काळीज उंदराचे' अशीच

"परीक्षांत घोटाळे केल्यानंतर आता विद्यापीठातून पदव्या विकण्याचा उद्योग सुरू करण्याचा हा प्रयत्न आहे. या कायद्यामुळे उच्च शिक्षण मंत्र्यांच्या हातात विद्यापीठाचा कारभार जाणार असून, त्यांना प्रकुलपतींचा दर्जा मिळणार आहे. सिनेटचा अधिकारही त्यांना जाणार आहे. विद्यापीठातील प्रशासन आणि शैक्षणिक धोरणे प्रकुलपती म्हणजे मंत्री राबविणार आहेत.त्यामुळे कुलगुरु हे पद 'रबर स्टॅम्प' राहणार आहेत. " असे फडणवीस म्हणाले.

''या विधेयकामुळे महाविद्यालयीन शिक्षणावर व्यापक प्रतिकूल परिणाम होणार आहेत.स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी विधेयक मांडून ते मंजूर केले आहे. आजचा दिवस सभागृहात काळा दिवस ठरला. हे सरकार घाबरट आणि पळपुटे असल्याचे या निमित्ताने दिसून आले,'' अशी टीका फडणवीस यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com